गायक हनी सिंग आजकाल त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. त्याने गेल्या वर्षी त्याची पत्नी शालिनी तलवार हिला घटस्फोट दिला. तर आता तो टीना थडानी हिला डेट करत असल्याचं नुकतंच समोर आलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हनी सिंगने त्याच्या गर्लफ्रेंडबाबत महत्वाचे खुलासे केले आहेत.
हनी सिंगने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मॉडेल टीना थडानीला त्याची गर्लफ्रेंड म्हणून ओळख करून दिली होती. दोघांनी मिळून ‘पॅरिस का ट्रिप’ नावाचे गाणे केले आहे आणि तेव्हाच त्यांची भेट झाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हनी सिंगने टीनाबद्दल मोकळेपणाने भाष्य केले.
हेही वाचा : “कमी शिकलेले लोक…” ‘पठाण’ला पाठिंबा देत हनी सिंगचं मोठं वक्तव्य, ए. आर. रहमान यांच्या नावाचाही उल्लेख
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत हनी म्हणाला, “मी तिच्यामुळे खूप आनंदी आहे. तिने माझे आयुष्य बदलले, मला प्रेरणा दिली. हा माझा पुनर्जन्म आहे आणि तो तिच्या आणि माझ्या नात्यामुळे होत आहे. त्यासोबतच आमच्या नात्याला आमच्या आई-वडिलांचा आशीर्वादही लाभला आहे.”
हनी सिंगने या वर्षी मार्चमध्ये तिला पहिल्यांदा भेटला होता. पण टीना थडानीला त्याला त्याच्या आयुष्यात आणण्यासाठी अनेक महिने प्रयत्न करावे लागले, असंही त्याने या मुलाखतीत सांगितलं. हनी सिंगने २०२१ मध्ये पत्नी शालिनी तलवारपासून घटस्फोट घेतला होता. आता पुढील वर्षी तो टीनाशी विवाहबद्ध होईल अशा चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत.