गायक आणि रॅपर हनी सिंग त्याच्या नवीन म्युझिक अल्बम ३.०मुळे चर्चेत आहे. सध्या तो त्याच्या अल्बमचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, हनी सिंगने त्याच्या गाण्यांच्या शब्दांवरुन होणाऱ्या वादांवर भाष्य केले. हनी सिंगच्या मते जर त्याच्या गाण्यांमध्ये महिलांसाठी अपमानास्पद शब्द असतील तर कोणीही त्याला स्वतःच्या मुलीच्या लग्नात परफॉर्म करायला बोलवणार नाही. असं म्हणत हनी सिंगने याबद्दल स्पष्ट बाजू मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पिंकव्हीला’शी संवाद साधतांना हनी सिंग म्हणाला, “जर असे असेल तर लोक माझी गाणी का ऐकतील? जर माझ्या गाण्यांमध्ये महिलांबद्दल अपमानकारक शब्द असतील तर मला कोणी त्यांच्या मुलीच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी का आमंत्रण देईल? कित्येक भावंडं माझ्या गाण्यांवर नाचतात. मी गेल्या १५ वर्षांत अनेक लग्नसोहळ्यांमध्ये परफॉर्म केले आहे. कित्येक महिला स्टेजवर येऊन माझ्याबरोबर ‘आंटी पोलीस बुला लेगी’ या मनसोक्त नाचतात करतात. त्यामुळे ज्या गोष्टीची चर्चा होत आहे ती योग्य नाही.”

आणखी वाचा : ‘झपाटलेला’ चित्रपटाला ३० वर्षं पूर्ण; सत्यजित पाध्ये यांनी मानले ‘तात्या विंचू’च्या लाखो चाहत्यांचे आभार

याच मुलाखतीमध्ये हनी सिंग पुढे म्हणाला, “लोक अधिक संवेदनशील झाले आहेत. आधी लोक खूप हुशार होते. शिक्षित असणं आणि हुशार असणं यात बराच फरक आहे. आपल्याकडे आजही हुशारीला शिक्षणाच्या तराजूत तोललं जातं. आधीच्या काळात लोकांच्या विचारांच्या कक्षा रुंदावलेल्या होत्या. मनोरंजनाकडे लोक त्याच दृष्टीकोनातून पहात. आता मात्र लोक खूपच संवेदनशील झाले आहेत. एखाद्या अभिनेत्रीने बिकिनी जरी परिधान केली तरी लोकांच्या भुवया उंचावतात.”

आणखी वाचा : हनी सिंगचं ‘लुंगी डान्स’ हे गाणं शाहरुख खानला आवडलं नव्हतं; रॅपर म्हणाला, “घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर…”

या मुलाखतीत हनी सिंगने त्याच्या मानसिक आजार आणि वेदनादायी संघर्षावर भाष्य केलं आहे. इंडस्ट्रीमध्ये पुन्हा पाऊल ठेवल्यावर हनी सिंगने स्वतःमध्येसुद्धा बरेच बदल केले आहेत. मानसिक आजारादरम्यान हनी सिंगने अत्यंत कठीण प्रसंगांना तोंड दिलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honey singh speaks about objectionable words in his songs rapper clarifies his side avn
Show comments