हनी सिंग पूर्वीसारखा गाणी तयार करण्यात सक्रिय नसला तरी तो आणि त्याची गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्याची जुनी गाणी त्यातले भन्नाट रॅप आजही अनेकांच्या ओठी असतात. हनी सिंग आधीपेक्षा कमी गाणी तयार करत असला तरी तो अनेक कारणांनी चर्चेत असतो. कधी त्याच्या जुन्या गाण्यांचे रॅप यामुळे तर कधी मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील किस्से सांगितल्यामुळे हनी सिंग चर्चेत येतो.
हनी सिंगच्या कॉन्सर्टमधील एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये हनी सिंग गाणे म्हणताना दिसतोय. स्टेजवर कागदांचा खूप कचरा असल्याने तिथे कचरा साफ करायला काही मुले येतात. त्यापैकी एक मुलगा कचरा साफ करता करता हनी सिंगच्या गाण्यावर थिरकायला लागतो. आणि पुन्हा झाडू मारतो.
हनी सिंग त्या मुलाला जवळ बोलावून गाता गाताच त्याच्या खांद्यावर हात टाकतो. तो मुलगा हनी सिंग गाणे गात असताना पुन्हा थिरकतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हनी सिंगचे चाहते त्याच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. “हा मनुष्य हिरा आहे” असे एका युजरने लिहिले. तर एका चाहत्याने लिहिले, “म्हणून तर हनी पाजी टॉपला आहेत.” असे म्हणत हनीचे चाहते कौतुक करत आहेत.
या व्हिडीओवर हनी सिंगला अलीकडेच एका मुलाखतीत त्याची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर हनी सिंग म्हणाला, “त्यांनी स्टेजवर कन्फोर्टींग फोडलं तेव्हा तिथे कचरा झाला. आणि तेव्हा स्टेज थोडा ओला होता आणि त्यामुळे माझा पाय सरकत होता. म्हणून मी तिथे साफसफाई करायला सांगितली. जेव्हा साफसफाई करायला एका मुलगा तिथे आला तेव्हा तो माझ्या गाण्यावर नाचू लागला आणि मी त्याला मी मिठी मारली. त्याने नंतर झाडू फेकला आणि तो माझा रॅप म्हणत डान्स करायला लागला. हे सर्व लोक माझ्या कुटुंबाचा भाग आहेत. यांच्यामुळेच माझ्याकडे गाडी, घर आणि पैसे आहेत.”
हेही वाचा…“तू सलमान खानला डेट केलं आहेस का?” चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत प्रीती झिंटा म्हणाली, “तो माझा…”
हनी सिंग पुढे म्हणाला, “माझ्यासाठी सगळेच जण माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे. एखादा कर्मचारी असो की बिझनेसमॅन किंवा तो एखादा विद्याथी असो ते माझे कुटूंब आहे असा मी विचार करतो.” हनी सिंगचे चाहते त्याच्या या विचारांचे आणि कृतीचे कौतूक करत आहेत.