बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला ‘हाऊसफुल’ या कॉमेडी चित्रपटाच्या सीरिजने प्रेक्षकांना वेड लावलं. २०१० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे सिक्वेलही प्रेक्षकांच्या तितकेच पसंतीस उतरले. ‘हाऊसफुल’ चित्रपटाप्रमाणेच इतर तीनही सिक्वेलह हीट ठरले होते. आता लवकरच याचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

साजिद नाडियावालाने ‘हाऊसफुल’ चित्रपटाच्या सीरिजची निर्मिती केली आहे. ‘हाऊसफुल ५’ चित्रपटासाठी तयारी करत असल्याची माहिती ‘पिंकविला’ने दिली आहे. मीडिया रिपोर्टमुसार, ‘हाऊसफुल’ सीरिजमधील सगळे कलाकार ‘हाऊसफुल ५’मध्ये दिसण्याची शक्यता आहे. ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाच्या प्रदर्शनापासूनच साजिद नाडियावाला या सीरिजच्या पुढच्या भागाचा विचार करत आहेत. ‘हाऊसफुल’ सीरिजमधील सगळ्या पात्रांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न ‘हाऊसफुल ५’ मध्ये करण्यात येत आहे. कथा आणि पटकथा यावर अजूनही काम सुरू आहे. ‘हाऊसफुल ५’ हा या सीरिजमधील सगळ्यात धमाकेदार चित्रपट असणार आहे.

Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sai Paranjpye Speech
Sai Paranjpye “अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केलं”, पद्मभूषण सई परांजपेंचे उद्गार
virat kohli anushka sharma alibag bunglow gruhapravesh
Video : विरुष्काच्या अलिबागमधील नव्या घराचा होणार गृहप्रवेश, फुलांनी सजलेल्या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल
IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”
Maha Kumbha Mela 2025 Shankar Mahadevan Mahesh kale Rahul Deshpande suresh wadkar and More To Perform at Grand Cultural Festival
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ मेळ्यात होणार सुरांची बरसात; शंकर महादेवन यांसारख्या दिग्गज गायकांसह ‘हे’ मराठी कलाकार सादर करणार परफॉर्मन्स

हेही वाचा >> ‘आई कुठे काय करते’मधील ‘संजना’चा मेकओव्हर, बदललेल्या लूकमागील कारण समोर

‘पिंकविला’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘हाऊसफुल’ चित्रपटाच्या सीरिजचे निर्माते साजिद नाडियावाला स्वत: ‘हाऊसफुल ५’साठी लिहिण्यात येत असलेल्या स्क्रिप्टमध्ये लक्ष घालत आहेत. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसह, रितेश देशमुख, बॉबी देओल, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चनही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच ‘हाऊसफुल’ सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या अभिनेत्रींही झळकणार असल्याची माहिती आहे.

हेही पाहा >> Photos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”

२०१० साली ‘हाऊसफुल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यांनतर २०१२ आणि २०१६ साली या चित्रपटाच्या सीरिजमधील दुसरा आणि तिसरा भाग प्रदर्शित करण्यात आला होता. ‘२०१९’ मध्ये ‘हाऊसफुल ४’ प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचा पुढच्या भागाचा विचार निर्माते करत होते. आता लवकरच ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा तीच धमाल, कलाकारांचा विनोदी अभिनय प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

Story img Loader