आर्टिफिशियल इंटेलिजेन्स म्हणजेच एआय (AI) हा शब्द आपल्या सर्वांना परिचयाचा झाला आहे. एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून अलीकडे भन्नाट प्रयोग केले जातात. म्हातारपणी आपण कसे दिसू? ते जगाचा शेवट होईल तेव्हा माणसाचे रूप कसे असेल, अशा सगळ्या प्रकारचे फोटो एआयच्या (AI) माध्यमातून बनवता येतात. भारतातील अशाच एका डिजिटल क्रिएटरने भारतीय अभिनेते म्हातारपणी कसे दिसतील हे AI च्या सहाय्याने दाखवायचा प्रयत्न केला होता.

याच तरुणाने आता हा प्रयोग अभिनेत्रींच्या बाबतीतही करून दाखवला आहे. डिजिटल क्रिएटर साहिद याने AI च्या सहाय्याने काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या म्हातारपणीचे काही फोटो पोस्ट केले आहेत जे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. साहिदने दीपिका पदुकोण, क्रिती सॅनॉन, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूर आणि आलिया भट्ट यांची एआय च्या मदतीने तयार केलेले फोटोज इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत.

girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Maharashtrachi Hasya Jatra Fame Onkar Raut
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…
janhvhi kapoor share her paintings
जान्हवी कपूर आहे उत्कृष्ट चित्रकार, रेखाटलं सुंदर चित्र; तुम्हालाही काढायचं आहे? जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स
tejashri pradhan shares post about her hashtag tadev lagnam marathi movie not enough screens
सिनेमा हाऊसफुल, तरीही थिएटर नाहीत…; तेजश्री प्रधानची खंत! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटासाठी पोस्ट करत म्हणाली…
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार

आणखी वाचा : “आम्हाला तुंबाड २ आणि ३…” प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता सोहम शाहचं मोठं विधान

AI च्या मदतीने तयार केलेल्या केलेल्या चित्रांमध्ये अभिनेत्रींची निस्तेज त्वचा, डोळ्यांखालील काळे डाग, आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या अगदी ठळकपणे दिसत आहेत. काही लोकांनी या फोटोजचं कौतुक केलं आहे, तर काहींना मात्र अभिनेत्रींच्या म्हातारपणाचे हे फोटो आवडलेले नाहीत आणि याबद्दल त्यांनी त्यांची मतं कॉमेंट सेक्शनमध्ये मांडली आहेत.

प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, ऐश्वर्या राय यांच्या फोटोचं लोकांनी कौतुक केलं आहे. तर क्रीती सनॉन, दीपिका पदूकोण यांचे फोटोज लोकांना अजिबात आवडलेले नाहीत. श्रद्धा कपूरच्या फोटोवरही लोकांनी टीका केली आहे. “दीपिकाला पाहून घाबरायला होत आहे” असं एका युझरने लिहिलं तर एका युझरने लिहिलं की “हे फोटो या अभिनेत्रींनी पाहिले तर त्यांना हार्ट अटॅक येईल.”

Story img Loader