बॉलीवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे रेखा. एके काळी अनेक अभिनेत्यांना रेखा यांच्यासोबत काम करायची इच्छा होती. रेखा या त्यांच्या चित्रपटांबरोबरच खासगी आयुष्यामुळे चर्चेत होत्या. त्यांचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते. अमिताभ बच्चन यांच्यापासून अगदी अक्षय कुमारसारख्या अभिनेत्यांबरोबर रेखा यांचं नाव जोडलं गेलं, पण आजही रेखा यांचं खरं प्रेम अमिताभ बच्चन आहे, असं त्यांचे बरेच चाहते मानतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक वेळ अशी आली जेव्हा रेखा यांनी या अफवांना पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दिल्लीतील बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्नही केलं होतं, पण हे लग्नही फार काळ टिकलं नाही. यासिर उस्मान यांच्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात या लग्नाविषयी सांगितलं आहे. १९९० मध्ये रेखा यांची मुकेशशी पहिली भेट झाली आणि महिनाभरानंतर दोघांनी लग्न केलं. रेखा यांनी हा निर्णय फार घाईमध्ये घेतल्याचीही चर्चा होते.

आणखी वाचा : …त्या नकारानंतर रेखा मुंबईतील रस्त्यावर रडत आणि अनवाणी फिरत होत्या

दोघांपैकी कोणाचेही नातवाईक या लग्नाला उपस्थित नव्हते. लग्नानंतर लगेच सहा महिन्यांत मुकेश यांचं निधन झालं, बऱ्याच लोकांनी यासाठी रेखा यांनाच जबाबदार धरलं, तर काहींनी मुकेश यांच्या व्यवसायातील तोट्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. याबरोबरच रेखा यांनी अभिनेता विनोद मेहरा यांच्याशीही लग्न गेल्याची चर्चा होती. असं म्हटलं जातं की १९७३ मध्ये या दोघांनी लग्नही केलं होतं, पण विनोद मेहरा यांच्या घरच्यांनी रेखाला सून म्हणून कधीच स्वीकारलं नाही.

रेखा यांनी मात्र विनोद मेहरा यांच्याबरोबरच्या लग्नाच्या अफवा खोडून काढल्या होत्या. २००४ मध्ये सिमी गरेवाल यांच्या टॉक शोमध्ये विनोद मेहरा हे फक्त चांगले मित्र असल्याचं रेखा यांनी कबूल केलं होतं. नंतर रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यातील नात्याबद्दल तर आपल्याला ठाऊक आहेच. याबरोबरच रेखा यांचं नाव राज बब्बर, जितेंद्र यांच्याशी जोडलं गेलं असलं तरी रेखा यांनी मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्नच केलं होतं, त्यानंतर त्यांनी कधीच लग्न केलं नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How many times actress rekha got married do you know the facts avn