ज्या क्षणांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. आज शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जवान’ प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. ‘जवान’ मल्टी स्टारर चित्रपट आहे. अशा या बहुचर्चित चित्रपटात एक मराठमोळा चेहरा देखील आहे. अभिनेत्री गिरीजा ओक हिने ‘जवान’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटासाठी गिरीजाची ऑडिशन कशी झाली? जाणून घ्या.

हेही वाचा – Video: राज ठाकरे यांच्यामधील खुपणारी एक गोष्ट कोणती? अभिजीत बिचुकले म्हणाले…

Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
Milind Gawali And Teja Devkar
पैसे संपले, अभिनेत्रीला कल्पना न देता निर्माते झाले पसार; नेमकं काय घडलेलं? मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग
Akshara Singh Death Threat
“५० लाख दे अन्यथा…”, प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी
mahshettey acting debut with salman khan upcomimg movie sikandar
सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटात झळकणार ‘बिग बॉस’चा स्पर्धक; सेटवरील फोटो आला समोर

‘जवान’ चित्रपटाच्या निमित्तानं गिरीजा ओकने नुकतीच ‘राजश्री मराठी’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलला मुलाखती दिली. यावेळी तिला विचारलं गेलं की, “तुझ्या ऑडिशनच्या मागे एका खास किस्सा आहे. तुझ्यासाठी विशेष भूमिका लिहिली गेली आहे. काय नेमकं घडलं होतं?” गिरीजा म्हणाली की, “मला एका वेगळ्या भूमिकेच्या ऑडिशनसाठी फोन आला होता. जेव्हा ऑडिशनचा फोन येतो तेव्हा ते तुम्हाला अधिक माहिती देत नाहीत. तुम्ही ऑडिशन दिल्यानंतर सगळी माहिती देतात. एक मोठा चित्रपट आहे, मोठा अभिनेता आहे, असं सगळं मला सांगितलं होतं. मी जाऊन ऑडिशन दिली. पण काही कारणास्तव ती भूमिका नाही तर दुसऱ्या भूमिकेसाठी तुला ट्राय करूया, असा मला पुन्हा फोन आला. दिग्दर्शकाला वाटतंय की, तुला एका वेगळ्या भूमिकेसाठी घ्याव. तर मी म्हटलं, ठीक आहे. मी परत येते. त्यामुळे मी पुन्हा जाऊन दुसरी टेस्ट दिली. त्यानंतर मला पुन्हा फोन आला की, दिग्दर्शकाला तुला भेटायचं आहे.”

हेही वाचा – मराठमोळ्या गिरीजा ओकने ‘जवान’साठी पहिल्या दिवशी पुण्यात केलेलं शुटिंग; ‘या’ ठिकाणाचा उल्लेख करत म्हणाली…

पुढे गिरीजा म्हणाली, “मग मी दिग्दर्शकाला जाऊन भेटले. तेव्हा तो मला असं म्हणाला की, ‘माझ्या चित्रपटात पाच-सहा मुली आहेत; ज्यांची फार इंटरेस्टिंग भूमिका आहे. त्यातल्या मला चार सापडल्या आहेत. पाचवी आणि सहावी अजून मी शोधतोय. पण अजून माझं ठरलं नाहीये की, मुली पाचच असतील की सहा असतील. कारण मी प्रत्येकांमध्ये काहीतरी शोधतोय. चार मुली अशा सापडल्या आहेत, ज्यांच्यामध्ये मला काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय. पण मला अजून दोन सापडल्या तर दोन नाहीतर एकच. कारण एकीची भूमिका लिहीली आहे. पण जी सहावी भूमिका आहे, तिच्याबद्दल आतापर्यंत फारस काही लिहीलं नाहीये. त्यामुळे तिची भूमिका आता लिहिणार आहे आणि ती मुलगी तू आहेस. तर मग तुला अशापरिस्थितीत काम करायला आवडेल का? आता मी तुला नाही सांगू शकत की, तुझी नक्की भूमिका काय आहे? पण तुला मी हे सांगू शकतो की, या सहाजणींना भूमिका समान वाटू दिल्या आहे. त्यामुळे आता पुढे बघूया. मला तुझी ऑडिशन आवडली. तू फार इंटरेस्टिंग वाटलीस. तर आता आपण हे डेव्हलप करू या. तुझा माझ्यावर विश्वास आहे का? अशा परिस्थितीत तुला हो म्हणायला आवडेल का? कारण मी आता तुला स्क्रिप्ट देऊ शकत नाही. त्यामध्ये टेक्निटली तुझी भूमिकाच नाहीये.”

हेही वाचा – रश्मिका मंदाना विजय देवरकोंडाबरोबर राहतेय लिव्ह-इनमध्ये? ‘या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

“यावर मी म्हणाले की, तुम्ही मला हे प्रामाणिकपणे सांगितलं, हे फार इंटरेस्टिंग वाटलं. आणि असं कितीवेळा होतं की, मला भेटल्यानंतर माझ्याबरोबर बोलल्यानंतर माझ्यासाठी म्हणून काहीतरी लिहीलं जाईल. त्यामुळे ही माझ्यासाठी उत्तम संधी आहे. मी याचा एक भाग होतेय हेच मला आवडलं होतं. जे काही असेल छोटी किंवा मोठी भूमिका मी करायला तयार आहे.”

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी लग्नाच्या चर्चांवर स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी ४ फेब्रुवारीला…”

पुढे गिरीजा म्हणाली की, “मी खरंच आनंदी आहे, मी त्यादिवशी असा विचार केला. अरे बापरे आपल्याला काय मिळेल? काही काम करायला मिळणार की नाही? असा विचार करून मी बॅकआउट नाही झाले. पण एक विचार डोक्यात येऊन जातो की, आपल्याला काम माहित नाही तर आपण साइन अप कशासाठी करतोय. मी त्याच दिवशी त्याला सांगितलं की, माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी तुझं काम पाहिलं आहे. मी तुझ्या कामाची चाहती आहे. तर आपण हे काम करू. पुढे काय होतं ते बघू. पण नंतर काय घडलं हे तुम्ही पाहताय.”