Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंट जुलै महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. पण त्यापूर्वी १ मार्च ते ३ मार्च दरम्यान अनंत-राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या तीन दिवसाच्या सोहळ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच या सोहळ्याला हॉलीवूड, बॉलीवूड, राजकीय, क्रीडा, उद्योग क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती. अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची चर्चात फक्त देशातच नाही तर जगभरात होतं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३ मार्चला हा सोहळा संपला असला तरीही याबद्दल अजून चर्चा सुरू आहे. मुकेश अंबानींनी कोणत्या सेलिब्रिटीला किती मानधन दिलं? लेकाच्या या शाही प्री-वेडिंगसाठी किती खर्च केला? याविषयी सध्या चर्चा रंगली आहे. तर मग आज आपण बॉलीवूडच्या तीन खाननी किती बरं मानधन घेतलं असेल? जाणून घेऊयात…

हेही वाचा – Video: नीता अंबानींनी लेक ईशासह केलेला सुंदर परफॉर्मन्स पाहिलात का? व्हिडीओ होतोय व्हायरल

अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, १ मार्चला जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. तिसऱ्या दिवशी, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. माहितीनुसार, या संपूर्ण सोहळ्यासाठी अंबानींनी तब्बल १००० कोटींचा खर्च केल्याचं म्हटलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुकेश अंबानींनी लेकाच्या प्री-वेडिंगसाठी जी रक्कम खर्च केली आहे, ती त्यांच्या एकूण संपत्तीच्या केवळ ०.१% इतकीच आहे. त्यामुळे बॉलीवूडच्या तीन महागड्या सुपरस्टार्सना किती बरं मानधन दिलं असेल? असा पडलाच असेलच.

हेही वाचा – काय म्हणता! अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटात ‘हा’ बॉलीवूड सुपरस्टार झळकणार

तर, शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानने अंबानींच्या लेकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी एकही रुपया न घेतल्याचं समोर आलं आहे. ‘टाइम्स नाउ’च्या वृत्तानुसार, शाहरुख, सलमान आणि आमिरला एकत्र आणण्याचा निर्णय अचानक घेतला होता. यापैकी एकानेही परफॉर्म करण्यासाठी एक रुपया देखील घेतला नाही. बॉलीवूडच्या या तीन खानने संगीतच्या कार्यक्रमात ‘नाटू नाटू’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. यावेळी या तीन खानबरोबर दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण देखील पाहायला मिळाला. त्यामुळे त्याने देखील परफॉर्मन्ससाठी कोट्यवधी रुपये घेतले असतील असं म्हटलं जात होतं. पण त्याने देखील अंबानींकडून एकही रुपया घेतला नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How much charged shahrukh salman khan and aamir khan for anant ambani and radhika merchant pre wedding event pps
Show comments