‘अॅनिमल’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आज १४ व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाने अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स मोडले आहेत. चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर व रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका आहेत. याच चित्रपटात बॉबी देओल, तृप्ती डिमरी, उपेंद्र लिमये, सौरभ सचदेवा हे कलाकार खूप लहान भूमिकांमध्ये दिसले पण त्यांच्या पात्रांची प्रचंड चर्चा होत आहे.
या चित्रपटात अभिनेत्री तृप्ती डिमरीने झोया नावाची भूमिका साकारली. तिच्या छोट्या पण दमदार भूमिकेने तिला नॅशनल क्रशचा टॅग मिळवून दिला आहे. तसेच तिला भाभी २ असंही म्हटलं जात आहे. तृप्तीची भूमिका खूप लहान होती, पण या भूमिकेने तिला तिच्या आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांपेक्षा जास्त लोकप्रियता मिळवून दिली. ‘बुलबुल’, ‘कला’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका करणाऱ्या तृप्तीला ‘अॅनिमल’मधील छोट्या भूमिकेमुळे प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. या चित्रपटासाठी तृप्तीने किती मानधन घेतलं, याबाबत माहिती समोर आली आहे.
माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांचं मराठी ऐकलंत का? म्हणाले, “माझं मराठी…”
‘लाइफस्टाइल एशिया’च्या वृत्तानुसार, संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित चित्रपटात झोया रियाझची भूमिका साकारण्यासाठी तृप्ती डिमरीने ४० लाख रुपये मानधन घेतलं आहे.
दरम्यान, ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे तृप्तीच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तृप्तीचे साडेसहा लाख फॉलोअर्स होते. ती संख्या आता ३.७ मिलियनवर गेली आहे. लोकांकडून मिळणाऱ्या प्रेमाचा, कौतुकाचा खूप आनंद होतोय, असं तृप्तीने प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं.