‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून बराच गदारोळ निर्माण झाला आहे. हा चित्रपट ५ मे रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे. अनेक राजकीय पक्षांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला असून त्यावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
हेही वाचा- एक तोंडावर थुंकला, तर दुसऱ्याने धरला गळा; अनिल कपूर आणि सनी देओलमध्ये ‘त्या’ सीनवरुन झाला होता राडा
‘द केरळ स्टोरी’चा ट्रेलर रिलीज होताच देशभरात खळबळ उडाली आहे. या चित्रपटात हिंदू मुलींचे ब्रेनवॉश करून धर्मांतर करून त्यांचा दहशतीसाठी कसा वापर केला जातो हे दाखवण्यात आले आहे. सुदिप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी, सिद्धी इदनानी, विजय कृष्णा, प्रणय पचौरी, प्रणव मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा- ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून वातावरण तापण्याची शक्यता; प्रदर्शनापूर्वीच ‘या’ राज्यात हाय अलर्ट जारी!
बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चित्रपट ५ ते ७ कोटींची कमाई करण्याची शक्यता आहे. चित्रपटात कोणताही मोठा स्टार नाही, पण देशात चित्रपटाबाबत जे वातावरण तयार होत आहे ते पाहता आगामी काळात त्याची कमाई वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, चित्रपटाला वाढत्या विरोधानंतर चित्रपटावर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने चित्रपटावर कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला.‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून वातावरण तापण्याची शक्यता; प्रदर्शनापूर्वीच ‘या’ राज्यात हाय अलर्ट जारी!
हेही वाचा- रणबीर आणि आलियाला ‘यंग स्टार’ म्हणताच भडकली होती कंगना; म्हणालेली “३७ वर्षांचा तो…”
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये केरळमधून जवळपास ३२००० महिला बेपत्ता झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. आता निर्मात्यांनी त्यात बदल केला आहे. आज या चित्रपटाच्या नवीन टीझरच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक मोठा बदल केला गेला. आता त्या जागी असे लिहिण्यात आले आहे की, तीन महिलांचा ब्रेनवॉश करून, त्यांचे धर्मांतर करून त्यांना भारत आणि परदेशातील दहशतवादी मोहिमांवर पाठवण्यात आले होते. या चित्रपटावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी तमिळनाडूमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच हाय अर्लट जारी करण्यात आला आहे.