करण जोहर सध्या त्याच्या ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनमुळे चांगलाच चर्चेत आहे. पहिल्या भागात रणवीर आणि दीपिका यांनी हजेरी लावल्यावर शोची अधिक चर्चा होऊ लागली. पाठोपाठ सनी देओल व बॉबी देओल आणि सारा अली खान व अनन्या पांडे यांनीही या चॅटशोमध्ये हजेरी लावली. तेव्हापासूनच याच्या पुढील भागात कोणते सेलिब्रिटीज पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. काही दिवसांपूर्वी नव्या भागाच्या टीझरमध्ये करीना कपूर व आलिया भट्ट दिसणार असल्याचं स्पष्ट झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या नव्या भागात नणंद आणि वाहिनीच्या जोडीने हजेरी लावून धमाल आणली. या नव्या भागाचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या नव्या भागात करणने आलिया आणि करीना या दोघींशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याचदरम्यान आलियाने पती व अभिनेता रणबीर कपूरबद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. रणबीर अपयशाचा कशाप्रकारे सामना करतो याबद्दल आलियाने खुलासा केला आहे.

आणखी वाचा : लोकेश कनगराजनंतर प्रशांत नील युनिव्हर्सची चर्चा; प्रभासच्या ‘सालार’मध्ये दिसणार KGF च्या रॉकी भाईची झलक

रणबीर बॉक्स ऑफिस कलेक्शनचं दडपण कशारीतीने हाताळतो याबद्दल आलिया म्हणाली, “रणबीर का खरंच याबाबतीत खूप शांत असतो. बरीचशी पुरुष मंडळी आपल्या अपयशाबाबत कुणाशी बोलत नाहीत, ते स्वतःचा स्वतःचा मार्ग काढतात, पण रणबीर तसा नाही, त्याला एखादी गोष्ट सतावत असेल तर तो त्याबद्दल माझा सल्ला घेतो, चर्चा करतो.” रणबीरच्या फ्लॉप झालेल्या ‘शमशेरा’चासुद्धा आलियाने उल्लेख केला.

शमशेरा फ्लॉप झाल्यावर रणबीरने नेमकं काय केलं, त्याची मनस्थिति काय होती याचा खुलासा आलियाने केला आहे. आलिया म्हणाली, “यश असो वा अपयश दोन्हीचा सामना तो सारख्याच पद्धतीने करतो, तो या गोष्टी फार मनावर घेत नाही. नुकताच आलेला शमशेरा बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही, त्यावेळी करण मी तुझ्याबरोबर शूट करत होते, त्यावेळी रणबीर घरी एकटाच होता. तो संपूर्ण दिवस त्याने वाचन करण्यात, गोष्टी समजून घेण्यात आणि लोकांशी संवाद साधण्यात घालवला. जेव्हा मी घरी आले तेव्हा आम्ही यावर चर्चा केली, रणबीर म्हणाला की आता पुढे मी आणखी जास्त मेहनत घेईन अन् त्यानंतर आम्ही वेगळ्याच विषयावर गप्पा मारत होतो.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How ranbir kapoor dealt with failure of shamshera answers alia bhatt on koffee with karan 8 avn