रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ चित्रपट चांगलाच गाजला. अभिनेता रणवीर सिंह व अभिनेत्री सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकले होते. सिद्धार्थ जाधव, नेहा महाजन, गणेश यादव, सुचित्रा बांदेकर, वैदही परशुरामी, विजय पाटकर, अरुण नलावडे, उदय टिकेकर, सौरभ गोखले असे बरेच मराठी कलाकार मंडळी पाहायला मिळाले होते. अभिनेता सौरभ गोखले या चित्रपटात प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत झळकला होता. पण या चित्रपटासाठी त्याची निवड कशी झाली? याचा किस्सा नुकताच त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘रंगभूमी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलला नुकतीच अभिनेता सौरभ गोखलेने मुलाखती दिली. यावेळी त्याने दिग्दर्शक रोहित शेट्टीबरोबर झालेलं कनेक्शन सांगितलं. सौरभ म्हणाला, “हे कनेक्शन म्हणजे भगवंताची कृपा म्हणायला पाहिजे. मी एकेदिवशी मुंबई किंवा कुठे होतो हे आठवत नाही. मला एक फोन आला त्यांनी सांगितलं, रोहित शेट्टी अमुक तमुक चित्रपट करत आहेत. त्यामध्ये एक प्रमुख खलनायक आहे. त्या भूमिकेसाठी तुला ते विचारत आहेत. जर तुला इच्छा असेल तर? मी म्हटलं, का नाही. रोहित शेट्टीचा चित्रपट आहे आणि मी का नाही म्हणणे. मग ते म्हणाले, ओके आम्ही फक्त बघत होतो, तुम्हाला इच्छा आहे की नाही. मी म्हटलं, हो. मी करायला तयार आहे. मी फोन ठेवला आणि अनुजाला म्हटलं, असा असा एक फोन आला होता. ही काहीतरी छापूगिरी असणार आहे. स्पॅम कॉल येतात ना, मी या निर्मिती संस्थेत तुम्हाला काम देतो. तुम्ही ५० हजार द्या वगैरे, अशी मला शंका आली होती.”

हेही वाचा – ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाच्या वादावर सौरभ गोखले स्पष्टच बोलला, म्हणाला, “हे दुर्दैवी आहे….”

पुढे सौरभ म्हणाला, “पुण्यातील थिएटर अकॅडमी आहे, ज्यांनी घाशीराम कोतवाल नाटक केलं. तिथे आमच्या थिएटर अकॅडमीचा वाढदिवस होता. मार्च महिना होता. त्यानिमित्ताने त्यांचा कार्यक्रम सुरू होता, तेव्हा माझा फोन वाजला. मी फोन उचलला त्याच माणसाचा फोन होता. त्यांनी मला आधी झालेलं बोलणं सांगितलं. मग ते म्हणाले, तुमचं काम झालं आहे. आता जर तुम्ही फ्री असाल तर तुमच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक बोलेलं. ती तुला सर्व काही नीट सांगेल. मी म्हटलं, ओके, हे खरंच आहे. त्यानंतर त्यांच्या ऑफिसमधून फोन आला. सहाय्यक दिग्दर्शक आहे, तिने सर्व काही समजवलं. भूमिका सांगितली. तुला आवडेल का करायला की नाही? असं विचारल्यावर मी म्हणालो, तुम्ही असं का विचारताय? तर म्हणे, सहसा नकारात्मक भूमिका सहज स्वीकारत नाहीत. मी म्हटलं, नाही मला आवडेल करायला.”

“संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून बघता येईल असा चित्रपट रोहित शेट्टी करतात. त्यामुळे भूमिका कितीही नकारात्मक असली तरी त्यात चुकीच्या गोष्टी दाखवणार नाहीत. म्हटलं, उत्तम काहीच समस्या नाही. ती म्हटली, ठीक आहे सरांशी बोलते आणि पुढचं सगळं सांगते. मग मला ऑफिसला बोलवलं आणि गंमत म्हणून इम्प्रोव्हाइज करू, एक सीन शूट करू म्हटलं. तसा आम्ही सीन शूट केला आणि लगेच कॉन्ट्रॅक्ट साइन केलं. “

हेही वाचा – ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेता ‘सूर नवा ध्यास नवा’मधून बाहेर, भावुक पोस्ट करत म्हणाला, “आयुष्यात…”

“रोहित शेट्टी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, “सौरभच्या कामाच्या सगळ्या लिंक घेतल्या त्याचं काम बघितलं आणि त्यानंतर निवड झाली.” त्यांच्या चित्रपटातील कुठल्याही कलाकाराला त्यांच्याशिवाय कोणीच निवडत नाहीत किंवा त्यांची टीम अनेक पर्याय देतात आणि मग ते ठरवतात,” असं सौरभ म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How saurabh gokhale was selected for rohit shetty simmba movie pps
Show comments