आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘जोधा अकबर’ हा चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय व अभिनेता अभिषेक बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजल्याचे पाहायला मिळत होते. आता हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे ऑस्करच्या ॲकाडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट अँड सायन्सेसमध्ये हा चित्रपट दाखवला जाणार आहे.
जोधा अकबर चित्रपटाला १७ वर्ष पूर्ण
आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना म्हटले, “जोधा अकबर चित्रपटाला १७ वर्ष पूर्ण झाली. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापासून ते चित्रपटाला ऑस्करच्या अकादमी स्क्रीनिंगमध्ये स्थान मिळेपर्यंतच्या या प्रवासात अनेकांचा हातभार आहे. या चित्रपटाशी जोडले गेलेल्या लोकांमुळे हे सर्व शक्य झाले आहे. जोधा अकबर सिनेमाचं आजही ज्या प्रमाणात कौतुक होत आहे, त्यामुळे एक उत्साह निर्माण झाला आहे. जगभरात चित्रपटाला मिळत असलेल्या प्रेमाने मी भारावून गेले आहे”, असे म्हणत आशुतोष गोवारीकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘जोधा अकबर’ या हा सिनेमा मोठा सेट, कथानक, चित्रपटातील कलाकारांचे पोशाख अशा अनेक गोष्टींमुळे चर्चेत होता. जोधा अकबर या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. ‘जोधा अकबर’ या चित्रपटाशिवाय ऐश्वर्या राय व हृतिक रोशनने ‘गुजारिश’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.
हृतिक रोशनच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास तो गेल्यावर्षी ‘फायटर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात दीपिका पदुकोणने त्याच्याबरोबर प्रमुख भूमिका साकारली होती. नुकतेच रोशन कुटुंबीय द रोशन या डॉक्युमेंटरच्या सक्सेस पार्टीमध्ये एकत्र दिसले. यामध्ये रेखा, अमिषा पटेल, जॅकी श्रॉफ अशा अनेक लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी हृतिकचा मुलगादेखील दिसला. अभिनेत्याचा मुलगा रिदानने त्याच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ऐश्वर्या रायच्या कामाबद्दल बोलायचे तर अभिनेत्री ‘पोन्नियन सेल्वन २’मध्ये दिसली होती. चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाल्याचे दिसले. याबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत होती. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रायचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, दोघांनीही त्यावर कोणतेच उत्तर दिले नाही. याशिवाय ते विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सध्या एकत्र दिसतात.