हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. मुलाखतींमध्ये त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल फारसं उघडपणे बोललं नसलं तरी ते सोशल मीडियावर त्यांचे फोटोज पोस्ट करतात. अलीकडेच, हृतिक आणि सबा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून त्यांच्या नात्याला ३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

हृतिक आणि सबाने एक फोटो शेअर केला ज्यात हृतिकने एक गोल टोपी घातलेली आहे आणि त्याच्या डोळ्यांवर चष्मा आहे. सबाने तिच्या हाताने हृतिकचा हात पकडलेला दिसतो. हृतिकने त्याच्या पोस्टला , “हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी पार्टनर” असं कॅप्शन दिलं तर सबाने देखील तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हाच फोटो शेअर करत “हॅपी ३ इयर्स पार्टनर.” असं लिहिलं आहे.

Maghi ganesh chaturthi 2025 wishes messages quotes sms whatsapp facebook status in marathi
Maghi Ganesh Jayanti Wishes : माघी गणेश जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा खास शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन
Marathi actress Tejashri Pradhan Talk about Divorce controversy
घटस्फोटानंतर तेजश्री प्रधान सगळ्यांना कशी सामोरे गेली? म्हणाली, “माझ्या आयुष्यात जे घडलंय त्यासाठी त्याला…”
soumendra jena success story
Success Story: १० बाय १० ची खोली ते दुबईतील आलिशान बंगला; १७ वर्षांच्या मेहनतीने बदलले नशीब
Beating of girlfriend by boyfriend on road
“त्याने आधी तिच्या कानाखाली मारली नंतर केस ओढले…” भररस्त्यात प्रियकराकडून प्रेयसीला मारहाण; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “त्याची मर्दांगी…”
shilpa and namrata shirodkar meet
“तुझ्याशी साधं बोलणंही खूप…”, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रताची घेतली भेट; पोस्ट करत म्हणाली…
Girlfriend murder boyfriend, Pimpri-Chinchwad, murder ,
पिंपरी-चिंचवड: प्रेयसीने मित्रांच्या मदतीने प्रियकराची केली हत्या; प्रियकर निघाला ‘बीड’चा!

हेही वाचा…तुषार कपूरची दोन फेसबुक अकाउंट हॅक; चाहत्यांना माहिती देत म्हणाला, “माझी टीम…”

हृतिकच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने दिली प्रतिक्रिया

हृतिकच्या पूर्वाश्रमीची पत्नी सुजैन खानने या पोस्टवर कमेंट केली आहे. सुजैनने या पोस्टवर “सुपर पिक!! हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी अशी कमेंट केली आहे. हृतिकची पुतणी पश्मीना रोशनने देखील या पोस्टवर कमेंट केली आहे. तिने “आह्ह, किती गोड!” असं लिहील आहे.

Sussanne Khan commented on hrithik roshan post
हृतिकच्या पूर्वाश्रमीची पत्नी सुजैन खानने त्याच्या सबा आझादसाठी लिहिलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट केली आहे. (Photo Crdit – Hrithik Roshan Instagram post)

हृतिक आणि सबा २०२२ पासून अनेकदा एकत्र दिसतात. ते करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीला हातात हात घालून एकत्र पोहोचले होते. अलीकडेच सबा २०२४ च्या गणेश चतुर्थी उत्सवात हृतिकचे वडील राकेश रोशन यांच्या घरी सहभागी झाली होती. ती पिंकी रोशन, सुनैना रोशन आणि रोशन कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर गणपतीची आरती करताना दिसली.

हेही वाचा…रणवीर सिंह ‘या’ भूमिकेसाठी माझ्यासमोर बसला होता तीन तास, शक्तिमान फेम अभिनेत्याच वक्तव्य; म्हणाला “त्याच्या चेहर्‍यावर…”

हृतिकने २०१४ मध्ये घेतला घटस्फोट

हृतिकने यापूर्वी इंटीरियर डिझायनर सुजैन खानबरोबर लग्न केले होते आणि त्यांना रेहान आणि ऋधान ही दोन मुलं आहेत . २०१४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला असून ते एकत्र मुलांचा सांभाळ करत आहेत. सुजैन, ज्येष्ठ अभिनेता संजय खान आणि झरीन खान यांची मुलगी आहे, ती सध्या आर्सलान गोनीला डेट करत आहे.

हेही वाचा…Video : शाहरुख खान आणि विकी कौशलचा ‘ऊ अंटावा’ गाण्यावर डान्स; समांथा रुथ प्रभू व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मी स्वप्नातही…”

हृतिक रोशनचे आगामी प्रोजेक्ट्स

हृतिक पुढे यशराज फिल्म्सच्या ‘वॉर २’ मध्ये दिसणार आहे, याचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहेत. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत . हा अ‍ॅक्शन-थ्रिलर सिनेमा आदित्य चोप्राच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे, ज्यामध्ये ‘पठाण’, ‘टायगर ३’, आणि ‘अल्फा’ या चित्रपटांचा समावेश आहे.

Story img Loader