अभिनेता हृतिक रोशन हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती त्याच्या आगामी ‘फायटर’ या चित्रपटाची. या चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षीच करण्यात आली होती, तेव्हापासूनच त्याचे चाहते या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. नुकताच तो या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आसामला रवाना झाला आहे. या वेळेचा त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून तो चाहत्यांकडे एक मोठी मागणी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याची ही मागणी चाहत्यांनी एका क्षणात पूर्ण केली.

हृतिक रोशन चित्रपटाच्या शूटिंगसाठी आपल्या शहरात आला आहे कळताच त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. हृतिक रोशन ची एक झलक पाहण्यासाठी ते त्याच्या मागे मागे शूटिंग लोकेशनवर पोहोचले. चाहत्यांच्या इच्छेला मान देऊन हृतिकनेही चाहत्यांना आपली झलक दाखवली.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Fans and netizens reaction on tejashri Pradhan exit from premachi goshta serial
“खूप वाईट वाटतंय..”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील तेजश्री प्रधानच्या एक्झिटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “तुझा निर्णय…”
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas : “मी धनंजय मुंडेंचा राजीनामा….”, अजित पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले सुरेश धस?
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा : “माझा प्रेमभंग झाला तेव्हा…”; अपारशक्ती खुरानाने शेअर केला होता त्याचा अनुभव

यावेळी त्याचे चाहते त्याच्याशी संवाद साधण्यासाठी आणि त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे मागे येऊ लागले. चाहत्यांची गर्दी जमा होतेय असं पाहून हृतिक तिथून निघू लागला. तेव्हा त्याने चाहत्यांकडे एक महत्त्वाची मागणी केली. तो म्हणाला “मी चित्रपटाच्या शूटिंगला जात आहे, कृपया मला शुभेच्छा द्या.”

ऋतिकची ही मागणी चाहत्यांनी हसत हसत स्वीकारली आणि त्याला ‘फायटर’ या त्याच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. हृतिकचा या वेळेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हृतिकच्या नम्रपणाचे सर्वजण कौतुक करत आहेत.

हेही वाचा : गणितज्ञ डॉ. वशिष्ठ नारायण सिंह यांच्या बायोपिकमधून हृतिक रोशनचा पत्ता कट, जाणून घ्या कारण

दरम्यान दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला ‘फायटर’ हा चित्रपट भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट आहे. भारताच्या सशस्त्र दलांना मानवंदना देणारा हा चित्रपट २०२४ साली प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader