बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मुलगा आहे. पण बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यालाही बराच संघर्ष करावा लागला आहे. वडील राकेश रोशन यांनी हृतिकला स्टार कलाकाराचा मुलगा म्हणून कधीच सूट दिली नाही. सुरुवातीच्या काळात हृतिक रोशन वडिलांना दिग्दर्शनात असिस्ट करायचा तेव्हा त्याला स्टारकिड्ससारखी वागणूक मिळत नसे. इतर असिस्टंटप्रमाणेच त्यालाही सामान्य वागणूक मिळत असे. एकीकडे राकेश रोशन आपल्या कारने सेटवर येत- जात असत तेव्हा हृतिक मात्र बस, रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करत असे. आता बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांमध्ये गणल्या जाणाऱ्या हृतिकचा आज ४९ वा वाढदिवस आहे.

हृतिक रोशनने करिअरच्या सुरुवातीपासून आपल्या वडिलांनी दिलेली सगळीच काम मेहनतीने आणि मनापासून पूर्ण केली होती. प्रचंड मेहनती असलेल्या या अभिनेत्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर फक्त भारतातच नाही तर जगभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एवढंच नाही तर हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्टही हृतिकच्या कामाची आणि त्याच्या लूकची चाहती आहे. एका मुलाखतीत तिने हृतिकचं खूप कौतुक केलं होतं आणि त्यावेळी तिने केलेलं एक वक्तव्य प्रचंड चर्चेत होतं.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
Tejashri Pradhan First Post Share after exit premachi goshta serial
“काही वेळेला बाहेर पडणं…”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला रामराम केल्यानंतर तेजश्री प्रधानची पहिली पोस्ट, म्हणाली, “तुमची कुवत…”

आणखी वाचा- सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची तारीख ठरली? अभिनेता २० तारखेचा उल्लेख करत म्हणाला…

क्रिस्टन स्टीवर्ट त्यावेळी ‘ट्विलाइट’मधील सहकलाकार रॉबर्ट पॅटिनसनला डेट करत होती. याच दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत क्रिस्टनने हृतिकच्या लूक्सचं कौतुक करताना म्हटलेलं, “जर मी आई झाले आणि मुलाला जन्म दिला तर तो हृतिकसारखा दिसायला हवा आणि त्याचे डोळे मात्र रॉबर्टसारखे असावेत असं मला वाटतं.”

आणखी वाचा- “प्रभाससमोर हृतिक रोशन…” एसएस राजामौली यांचं जुनं वक्तव्य चर्चेत, नेटकरी म्हणाले…

अर्थात काही वर्षांनंतर क्रिस्टन स्टीवर्ट आणि रॉबर्ट पॅटिनसन यांचं ब्रेकअप झालं. पण याच मुलाखतीत क्रिस्टनने हृतिकबरोबर काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. एखादी चांगली कथा मिळाल्यास बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा आहे असं तिने सांगितलं होतं. विशेषतः तिने हृतिक रोशनबरोबर काम करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं होतं. हृतिक खूपच हॅन्डसम आणि कमाल कलाकार आहे असं तिचं म्हणणं होतं. मध्यंतरीच्या काळात हृतिक आणि क्रिस्टन एकत्र काम करणार असल्याच्या चर्चाही झाल्या होत्या पण नंतर या चर्चा थंडावल्या.

दरम्यान हृतिक रोशनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो आगामी काळात ‘फायटर’ चित्रपटात दिसणार आहे. २०२४ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात हृतिकबरोबर अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असून हे दोघंही पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. तर दुसरीकडे हृतिकचं खासगी आयुष्यही सोशल मीडियावर बरंच चर्चेत आहे. तो मॉडेल सबा आझादला डेट करत आहे. काही काळापूर्वीच त्याने आपल्याची जाहीर कबुली दिली आहे.

Story img Loader