अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीने सोशल मीडियावर एक रील शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या रीलमध्ये दोघांचे अनेक फोटो आहेत. अर्सलानने शेअर केलेल्या या व्हिडीओवर हृतिक रोशनने कमेंट केली आहे.

‘या’ अभिनेत्रीने ‘रामलीला’ सोडल्याने लागलेली दीपिका पदुकोणची वर्णी, रणवीर सिंह खुलासा करत म्हणाला…

रील शेअर करत अर्सलान गोनीने लिहिले, “हॅप्पी बर्थडे माय लव्ह सुझान. मला खूप वाईट वाटतंय की मी सध्या तुझ्यासोबत नाहीये. खरं तर हा व्हिडीओ पाहून वाटतंय की आपण काही गोष्टी गमावू शकतो पण नक्कीच चांगल्या आठवणी बनवतो. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुला जगातील सर्व आनंद देणाऱ्या गोष्टी मिळो, अशी माझी इच्छा आहे. आपण वचन दिल्याप्रमाणे जेव्हाही भेटू तेव्हा सेलिब्रेशन करू. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.”

अर्सलानच्या व्हिडीओवर सुझानने कमेंटमध्ये लिहिलं, “माय लव्ह, माय जानू, तू माझे सर्वस्व आहेस. मी या ग्रहावरील सर्वात भाग्यवान स्त्री आहे आणि या विश्वाने मला दिलेली सर्वोत्तम भेट तू आहेस.” दरम्यान, या व्हिडीओवर हृतिकने “Sweet happy birthday guys!” अशी कमेंट केली.

hrithik roshan comment
हृतिक रोशनने व्हिडीओवर केलेली कमेंट

अर्सलानने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, सुझानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने २००० मध्ये हृतिक रोशनशी लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. ते दोघेही २०१४ मध्ये विभक्त झाले. त्यानंतर ती अर्सलान गोनीला डेट करू लागली.

Story img Loader