सध्या देशभरामध्ये नवरात्रोत्सवाची धामधूम आहे. नवरात्रोत्सवावर लादलेले निर्बंध काढल्यामुळे यंदा हा सण आणखी दणक्यात साजरा होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्र आणि फाल्गुनी पाठक असे समीकरण बनले आहे. नवरात्रोत्सवाच्या या नऊ दिवसांमध्ये गायिका फाल्गुनी पाठक खूप जास्त व्यग्र असतात. त्यांनी आयोजित केलेल्या गरबा-दांडियाच्या कार्यक्रमांना प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होत असते. त्यांच्या या कार्यक्रमांना बॉलिवूडमधील सेलिब्रिटीदेखील हजेरी लावत असतात. मुंबईतील बोरीवली परिसरामध्ये आयोजित केलेल्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये अभिनेता हृतिक रोशनने उपस्थिती लावली होती. या गरबा नाईटमधले फोटो-व्हिडीओ खुद्द फाल्गुनी पाठक यांनी पोस्ट केले आहेत.

हृतिक रोशन सध्या त्याच्या ‘विक्रम-वेधा’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. यासाठी तो फाल्गुनी यांच्या कार्यक्रमामध्येही हजर होता. त्याच्यासह चित्रपटाची दिग्दर्शक जोडी पुष्कर-गायत्रीही तेथे होते. मंचावर गेल्यावर त्याने भक्तांशी, रसिकांशी संवाद साधला. ‘कसा काय मुंबई, केम छो मजा मा?’ असे विचारल्यानंतर जमलेली गर्दी मोठ्याने ओरडायला लागली. पुढे त्याने फाल्गुनी यांचे कौतुक करताना ‘फाल्गुनी जी मी तुमचा मोठा चाहता आहे. तुम्ही माझ्याबरोबर नाचाल का?’ असे विचारले. त्यावर हसत फाल्गुनी पाठक म्हणाल्या, ‘मला तुमच्यासारखं नाचता येणार नाही, पण मी तुमच्याबरोबर गरबा नक्की करेन’

आणखी वाचा – प्रिया बापटचा वेब सीरिजमधील बोल्ड सीनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आई म्हणाली, “चूक झाली…”

यानंतर त्या दोघांनी सर्वांसमोर गरबा केला. फाल्गुनी यांच्या ‘वासलडी’ या सुपरहिट गाण्यावर ते दोघेही नाचले. फाल्गुनी यांनी ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातील हृतिकची आयकॉनिक स्टेपदेखील केली. याचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला फाल्गुनी पाठक यांनी “हृतिक रोशनचे वासलडी व्हर्जन. नवरात्र आहे तर गरबा असायलाच हवा ना..” असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 4: “तुझ्यासारख्या गर्विष्ठ व्यक्तीबरोबर खेळण्यापेक्षा…”, अपूर्वा-प्रसादमधील वाद गेला विकोपाला

हृतिकने तेथील देवीच्या मूर्तींचे दर्शन घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. बालपणातील नवरात्रोत्सवाच्या आठवणी सांगताना तो म्हणाला, “मी लहान असताना गरबा-दांडिया खेळायचो. मला खूप मजा यायची. पुढे माझी आजी चित्रपटाच्या स्क्रिप्ट्स देवीच्या मूर्तींच्या शेजारी ठेवायला लागली. माझ्या कामात ऊर्जा यावी यासाठी मी हे करते असे ती म्हणायची”

Story img Loader