बॉलिवूडचा हँडसम हंक अशी ओळख असलेला अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान ही कायमच चर्चेत असते. हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट होऊन अनेक वर्ष उलटली आहेत. सुझान खान ही सध्या अर्सलन गोणी याला डेट करत आहे. आता त्या दोघांचा एक रोमँटिक व्हिडीओ समोर आला आहे.
हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती तिचा बॉयफ्रेंड अर्सलन गोणी आणि तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबर मेक्सिकोमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. “सूर्यकिरण, मजा-मस्ती आणि खूप आठवणी माझ्या आवडत्या लोकांबरोबर”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.
आणखी वाचा : लेकाच्या हॉटेलमध्ये महेश मांजरेकरांनी स्वतः बनवलं जेवण, आकाश ठोसरने शेअर केला व्हिडीओ; म्हणाला, “सर्व पदार्थ….”
या व्हिडीओत सुझान खान, अर्सलन गोणी आणि त्यांचे मित्र एका बोटीवर मज्जा करताना दिसत आहे. यावेळी सुझानने बिकीनी परिधान केली आहे. तर अर्सलन हा शर्टलेस असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तिने काही रोमँटिक फोटोही शेअर केले आहे. त्यात ती अर्सलनला किस करताना दिसत आहे.

आणखी वाचा : Video : चांदीच्या ताटातील पक्वान्न, सुंदर उखाणा अन्… प्रथमेश लघाटेच्या पहिल्या केळवणाचा थाट पाहिलात का?
सुझान खानचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे. “हृतिकच्या पैशावर हे दोन बेरोजगार मज्जा करत आहे”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. “हृतिकला सोडून याच्याबरोबर”, असे एकाने कमेंट करत म्हटले आहे. “तुला लाज कशी वाटत नाही? तुझी मुलं हा व्हिडीओ बघतील तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल”, अशी कमेंट एकाने केली आहे.