Sussanne Khan share Hrehaan Hridhaan photo : बॉलीवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हे काही वर्षांपूर्वी विभक्त झाले असले तरी ते अद्यापही आपल्या मुलांप्रती पालकांची जबाबदारी एकत्रितरित्या पार पाडत आहेत. हृतिक आणि सुझानच्या दोन मुलांचे नाव ह्रिहान आणि ह्रिधान आहे. सुझानने नुकताच तिच्या मुलांबरोबर एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला, ज्यात दोन्ही मुले खूप मोठी झाल्याचं दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या फोटोत सुझानने तिच्या मुलांबरोबर ‘ट्विनिंग’ केलं आहे. तिने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे, तर तिच्या मुलांनी डार्क ग्रे टी-शर्ट्स, कार्गो पँट्स, लेदर जॅकेट्स आणि स्नीकर्स घातले आहेत. या फोटोत ह्रिहानच्या चेहर्‍यावरील हेअरस्टाईल आणि दाढीमुळे तो त्याच्या वडिलांप्रमाणेच दिसत आहे.

हेही वाचा…Video : ‘मन्नत’ बाहेर ९५ दिवस किंग खानच्या भेटीसाठी थांबला चाहता, आर्यन खानसाठी लिहिली स्क्रिप्ट; पण…

फोटो शेअर करताना सुझानने कॅप्शनमध्ये लिहिले, “मी पाहिले की तुम्ही दोघं माझ्याबरोबर उभे होतात.. ही एक अप्रतिम भावना आहे, माझ्या ‘सनशाइन’ पेक्षा काहीच तेजस्वी नाही.” तिने या पोस्टला ‘ब्लेस्ड ममा’ असा हॅशटॅगदेखील दिला आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत लिहिलं की, “तुमची मुलं किती सुंदर आहेत, देव त्यांना आशीर्वाद देवो.” एका नेटकऱ्याने आश्चर्य व्यक्त करत लिहिलं, “हे दोघं एवढे मोठे कधी झाले?” काही जणांनी सुझानला “हॉटेस्ट मॉम” म्हटले, तर तिच्या मुलांना “बॉलीवूडचे पुढचे सुपरस्टार” असे म्हटले आहे.

सुझान खानने इन्स्टाग्रामवर तिच्या मुलांचा एक फोटो शेअर केला असून त्यावर युजर्सने कमेंट केल्या आहेत. (Photo Credit – Sussane khan Instagram)

हृतिक आणि सुझानने २००० साली लग्न केले होते, त्यानंतर हृतिकचा ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट आला आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला. २००६ साली त्यांचा पहिला मुलगा ह्रिहानचा आणि २००८ साली दुसरा मुलगा ह्रिधानचा जन्म झाला. त्यांनी २०१४ साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सध्या हृतिक सबा आझादबरोबर, तर सुझैन अर्सलान गोनीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांच्या नव्या नात्यांनंतरही ते आपल्या मुलांसाठी पालकत्वाचे कर्तव्य पार पाडत आहेत.

हेही वाचा…कंगनाने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उधळली स्तुतीसुमनं; म्हणाली, “मी अमेरिकन असते तर…”

दरम्यान, हृतिक ‘वॉर २’ मध्ये पुन्हा एकदा कबीरच्या भूमिकेत दिसणार आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. १४ ऑगस्ट २०२५ ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात कियारा अडवाणी आणि ज्युनिअर एनटीआरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत असतील.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan ex wife sussanne khan share sons hrehaan hridhaan photo goes viral psg