बॉलिवूडमधील कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असतात. अभिनेत्रींचे हटके फोटोशूट्स, नव्या चित्रपटांसाठी केलेला लूक या गोष्टी लगेच व्हायरल होत असतात. बॉलिवूडमधील अनेक कलाकार सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. अभिनेते, अभिनेत्री आपले लहानपणीचे किंवा जुने फोटो शेअर करत असतात. नुकताच विकी कौशलचा शाहरुख खानच्या ‘अशोका’ चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल झाला होता, तसाच आणखीन एक फोटो व्हायरल होत आहे.

हा फोटो तुम्ही बघितला असेलच या फोटोमध्ये असणारे लहानगे तुम्ही ओळखले असतील. या फोटोत लहानपणीचे हृतिक रोशन, उडवुया चोप्रा आणि फरहान अख्तर आहेत. हे तिघे लहानपणापासूनचे मित्र आहेत. यातील हृतिक रोशन आणि फरहान अख्तर यांनी एकत्र कामदेखील केले आहे. फरहान अख्तरने मागे एका मुलाखतीत सांगितले होते ‘मी हृतिक आणि उदय लहानपणी एकत्र खेळायचो, लहानपणी उदय चोप्राला दिग्दर्शक होण्याची इच्छा होती’, असे त्यांनी सांगितले होते.

किशोर कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त कलाकारांचा गौरव, विवेक अग्निहोत्री यांना मिळणार पुरस्कार?

तिघे आपल्या करियरमध्ये यशस्वी घोडदौड करत आहेत. हृतिकचा नुकताच ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. फरहान अख्तर उत्तम अभिनेता, दिग्दर्शक आहे. ‘तुफान’ चित्रपटात त्याने काम केले होते. मात्र ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाने त्याला वेगळी ओळख मिळाली. उदय चोप्रा ‘धूम ३’ चित्रपटात दिसला होता. सिनेसृष्टीपासून तो सध्या लांब आहे.

बॉलिवूडमध्ये आज अनेक जण एकमेकांचे मित्र आहेत. शाहरुख करण जोहर, अजय देवगण- संजय दत्त यांची मैत्री फार पूर्वीपासून आहे. हे अभिनेते मुलाखतींमधून आपल्या मैत्रीचे किस्से सांगत असतात. फरहान अख्तरने तर मैत्री या विषयावर ‘दिल चाहता है’ हा चित्रपट बनवला आहे.

Story img Loader