अभिनेता हृतिक रोशन हा सध्या त्याच्या आगामी ‘फायटर’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. गेले अनेक दिवस तो या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. आता अशातच त्याने एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांबरोबर वेळ घालवून त्याने त्यांना सांताक्लॉज बनून भेटवस्तू दिल्या.

हृतिक रोशन नुकताच आसाम येथील तेजपूर येथे या त्याच्या आगामी ‘फायटर’ चित्रपटाचं चित्रीकरण करत होता. ह्या चित्रपटाच्या शूटिंगचं पहिला शेड्युल त्याने तेजपूर येथील एअरबेसमध्ये केलं. त्यानिमित्त त्याला सैन्यातील अधिकाऱ्यांबरोबरही वेळ घालवायला मिळाला. आज हृतिकने त्या अधिकाऱ्यांबरोबर ख्रिसमसचं खास सेलिब्रेशन केलं.

Eknath Shinde Family
Eknath Shinde : शिंदे सासू-सुना मुख्यमंत्र्यांच्या विजयासाठी कंबर कसून मैदानात, एकमेकींचं कौतुक करत प्रचारात सहभागी!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Uddhav Thackeray, candidates, Kalyan, Eknath Shinde, Shiv snea
कल्याण पट्ट्यातील ठाकरेंचे उमेदवार ठरले, शिंदेचे ‘आस्ते कदम’
Jijau organization, Mahayuti, Thane district,
ठाणे जिल्ह्यात जिजाऊ संघटनेची साथ महायुतीला ?
satara shivsena
महेश शिंदे, मकरंद पाटील यांना पुन्हा उमेदवारी, साथ दिलेल्या विद्यमान आमदारांवर विश्वास
Shrinivas Vanga, MLA Shrinivas Vanga, Palghar,
पालघरमध्ये आमदार श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी टांगणीवर
Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray
Eknath Shinde : “मुख्यमंत्री करा म्हणत ते दारोदारी भटकत आहेत, त्यांचा चेहरा मित्रपक्षांनाही..”, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
sanjay raimulkar
बुलढाणा जिल्ह्यात शिंदेंनी शब्द पाळला, शिलेदार पुन्हा रिंगणात

आणखी वाचा : राजकारणी, पंतप्रधान, कवी… पाहा ‘मैं अटल हूँ’ या चित्रपटातील पंकज त्रिपाठींची पहिली झलक

यावेळी हृतिकने सांताक्लॉज बनून तेथील अधिकाऱ्यांना जिमची विविध साधनं भेट म्हणून दिली. यामध्ये लेग पुल डाउन, लेग एक्सटेंशन, रोलिंग मशीन, स्क्वोट रॅक लेग प्रेस मशीन इत्यादी उपकरणांचा समावेश आहे. हृतिकचा हा अंदाज बघून सर्व अधिकारीही खुश झाले. हृतिकच्या या कृतीबद्दल सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत.

हेही वाचा : हृतिक रोशनने चाहत्यांकडे केली मोठी मागणी; म्हणाला, “कृपया मला…”

दरम्यान हृतिकच्या आगामी ‘फायटर’ चित्रपटात त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय सेनेचं साहस, बलिदान आणि देशभक्तीला समर्पित करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. तब्बल २५० कोटी रूपयांचं बजेट असणार आहे. या चित्रपटाच्या मेकर्सनी भारतीय पातळीवर हा चित्रपट रिलीज करण्याची तयारी सुद्धा केलीय. २५ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेत रिलीज करण्यात येणार आहे.