बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझान नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर सबा सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. मात्र, सबा आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सबाने नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टवरुन ती गरोदर असल्याची चर्चा सुरु आहे.
सबाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यावर लिहिले आहे, ‘तुमचा स्त्रीरोगतज्ज्ञ कोण आहे?’ हा फोटो शेअर करताना सबाने लिहिले की, ‘सध्या फक्त हाच प्रश्न माझ्या मनात घोळत आहे.’ ही पोस्ट पाहून सबाचे चाहते आश्चर्यचकित झाले असून त्यांनी अभिनेत्रीला विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.
या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एकाने आधी लग्न कर आणि मग स्त्रीरोगतज्ज्ञाकडे जा असा सल्ला दिला आहे. तर दुसऱ्याने गोड बातमी आहे का? असा प्रश्न विचारला आहे.
हेही वाचा-‘या’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने घेतलं नव्हतं मानधन; मुलाखतीदरम्यान अभिनेत्याने सांगितलं कारण
हृतिकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच त्याचा ‘फायटर’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण स्क्रिन शेअर करणार आहे. २५ जानेवारी २०२४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. तसेच त्याचा ‘वॉर २’ चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये हृतिकबरोबर कियारा अडवाणी आणि जूनियर एनटीआर यांच्या मुख्य भूमिका आहेत. हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद शेवटची रॉकेट बॉईजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली होती.