बॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका सबा आझाद मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. हृतिक रोशनशी रिलेशनशिपमुळे तिची अनेकदा चर्चा होताना दिसते. एवढंच नाही तर या नात्यामुळे अनेकदा दोघांनाही ट्रोल केलं जातं. आताही असंच काहीसं घडलं. एका युजरने सबाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या युजरला सडेतोड उत्तर देत त्याची बोलती बंद केली आहे. एवढंच नाही तर तिने या युजरच्या अकाउंटचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

सबा आझादने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने तिला ट्रोल करणाऱ्या एका तरुणीच्या कमेंटचा स्क्रिनशॉट शेअर करत त्याखाली पोस्ट लिहिली आहे. यासह तिने या युजरच्या बायोचाही स्क्रिनशॉट शेअर केलाय ज्यात या युजरने ‘फन, फ्री, हॅप्पी, प्रेम, प्रेम सगळीकडे असतं. तिरस्काराला तुमच्या चांगुलपणावर मात करु देऊ नका’ असं लिहिलं आहे. या युजरने सबावर कमेंट करताना लिहिलंय, “तू खूपच घाणेरडी दिसत आहेस.”

आणखी वाचा- अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’बाबत ‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाचं मोठं वक्तव्य, म्हणाला “मी रामभक्त…”

saba azad instagram

सबा आझादने ही पोस्ट शेअर करताना लिहिलं, “ही श्रुती आहे. जाहिरपणे ती तिच्या प्रेम असलेल्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे. पण ती तिचा अगणित तिरस्कार शेअर करण्यासाठी मला फॉलो करते. हिच्यासारखे अनेकजण आहेत. श्रुतीप्रमाणे वागू नका. मला अनफॉलो करण्यासाठी तुम्ही सर्व स्वतंत्र आहात. दुर्दैवाने अद्याप श्रुतीला अद्याप ब्लॉक बटणाबाबत माहीत नाही. पण तिला ते लवकरच कळेल.”

आणखी वाचा-खरंच दुसऱ्या लग्नाची तयारी करतोय हृतिक रोशन? वाचा नेमकं काय आहे सत्य

दरम्यान हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचा रोमान्स सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. दोघंही अनेकदा बॉलिवूड पार्ट्या, एअरपोर्ट, लंच किंवा डिनरसाठी एकत्र दिसतात. आतापर्यंत दोघांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यांच्या नात्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलही केलं जातं. सबाच्या कामाबद्दल बोलायचं तर तिने ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘दिल कबड्डी’, ‘फील लाइक इश्क’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती अखेरची ‘रॉकेट बॉइज’ वेब सीरिजमध्ये दिसली होती.

Story img Loader