बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर सबा सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान सबाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटो काढणाऱ्या पापाराझींना सना चिडल्याचे दिसून आले.
जिममधून वर्कआऊट करून सना बाहेर पडताच पापाराझींनी तिचे फोटो काढण्यासाठी गर्दी केली. पापासाझींना फोटो काढतानाचं बघून सना वैतागली आणि चिडून म्हणाली. तुम्हाला माझे फोटो काढून काय करणा आहे. मी चालत जाणार आहे तुम्ही येणार माझ्याबरोबर चालत?” सबाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हृतिक किंवा सबा लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र अद्याप दोघांकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य समोरे आलेलं नाही. सध्या या दोघांचे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. २०१४ मध्ये हृतिकने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांच्या अफेअरबद्दल लोकांना माहिती झाली. करण जोहरच्या ५० व्या वाढदिवशी ते दोघे एकत्र मीडियासमोर आले आणि त्यांचं अफेअर असल्याचं स्पष्ट झालं.
हेही वाचा- “शिक्षा भोगणं…”, संजय दत्तला आठवले तुरुंगातील दिवस; म्हणाला, “ग्रंथ वाचन, स्वयंपाक अन्…”
हृतिक आणि सबाच्या कामाबाबत बोलायचं झालं तर लवकरच त्याचा ‘फायटर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण स्क्रीन शेअर करणार आहे. २५ जानेवारी २०२४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. तसेच त्याचा ‘वॉर २’ चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये हृतिकबरोबर कियारा अडवाणी आणि ज्युनियर एनटीआर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर सबा आझाद ‘रॉकेट बॉइज’च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली होती.