‘वैट्टेयन’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून सुपरस्टार रजनीकांत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. याआधीदेखील अनेक चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अभिनय आणि चित्रपटांशिवाय ते त्यांच्या दयाळू आणि प्रेमळ स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. चित्रपटसृष्टीशी आधी कोणताही संबंध नसताना त्यांनी या अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि मेहनत व कौशल्याने स्वत:ची वेगळी जागा त्यांनी निर्माण केली. कलाकार आणि अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी रजनीकांत हे प्रेरणास्थान आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा हृतिक रोशनच्या चुकीची रजनीकांत यांनी घेतलेली जबाबदारी

अभिनेता हृतिक रोशनने रजनीकांत यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव एका मुलाखतीत सांगितला होता. १९८६ साली प्रदर्शित झालेल्या भगवान दादा या चित्रपटात त्याने रजनीकांत यांच्याबरोबर बालकलाकार म्हणून काम केले होते. हा सिनेमा त्याचे आजोबा जे. ओम प्रकाश यांनी दिग्दर्शित केला होता. ‘समाचार प्लस’ला दिलेल्या एका मुलाखतीत हृतिक रोशनने म्हटले, “मी त्यांच्याबद्दल काय बोलू? माझ्याकडे शब्द नाहीत. भगवान दादा या चित्रपटाच्या वेळी मी लहान होतो. मी रजनीसरांना मित्र समजायचो आणि जे काही बोलायचे आहे, ते बोलून टाकायचो. ते खूप दयाळू होते. त्या काळात मी ज्या गोष्टी केल्या आणि त्यांना बोललो, त्याबद्दल त्यांनी माफ केले असावे. मात्र, एक गोष्ट मला स्पष्टपणे आठवते. शूटिंगच्या वेळी डायलॉग म्हणताना मी चूक केली आणि माझ्या चुकीमुळे आजोबांनी कट, असे म्हणत सीन कट केला. रजनीसरांनी लगेच सॉरी म्हणत माफी मागितली. त्यांनी म्हटले, “सॉरी सॉरी! माझी चूक आहे.” माझ्या चुकीची जबाबदारी त्यांनी घेतली. हे आठवताना आजही माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम जागृत होते.”

“मला वाटते की, त्यांच्या या स्वभावामुळे ते आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. एखाद्या लहान मुलाला त्याच्या सभोवती सहजता जाणवू देणे आणि त्याचा आत्मविश्वास कमी होईल अशा गोष्टी न करणे, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. माझ्या काबिल या चित्रपटाच्या वेळी रजनी सरांनी जो मला मेसेज पाठवला होता, तो मी सेव्ह केला आहे आणि मला वाटते की, मी तो अनेक वर्षे वाचेन. भगवान दादा या चित्रपटात श्रीदेवी, राकेश रोशन, टीना मुनीम हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला होता.

हेही वाचा: Shah Rukh Khan : शाहरुख खानने ९५ दिवस ‘मन्नत’बाहेर थांबलेल्या चाहत्याची घेतली भेट, म्हणाला..

दरम्यान, रजनीकांत यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच अनेक हिंदी चित्रपटांतदेखील काम केले आहे. ‘अंधा कानून’, ‘जीत हमारी’, ‘मेरी अदालत’, ‘गंगवा’, ‘महागुरू’, ‘वफादार’, ‘बेवफाई’, ‘दोस्ती दुश्मनी’, ‘गैर कानूनी’, ‘हम’ अशा अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रजनीकांत यांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठा असल्याचे वेगवेगळ्या माध्यमांतून पाहायला मिळते.