‘कहो ना प्यार है’सारख्या चित्रपटापासून असंख्य रसिकांच्या मनावर राज्य करणारा हृतिक रोशन हा बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनयाबरोच हृतिक त्याच्या जबरदस्त शरीरयष्टीसाठी आणि दमदार नृत्यकौशल्यासाठी लोकप्रिय आहे. शाहिद कपूरपासून टायगर श्रॉफपर्यंत कित्येक लोक हृतिकला डान्समधला गुरु मानतात. लहानपणी शारीरिक समस्या असून त्यावर मात करत हृतिकने नृत्यात निपुण झाला.

आजही प्रेक्षक हृतिकचा चित्रपट लागला की त्यातील त्याच्या डान्स नंबरसाठी प्रचंड उत्सुक असतात. हृतिकच्या ‘धूम २’मधील ‘धूम अगेन’ हे गाणं फक्त हृतिकच्या डान्ससाठीच ओळखलं जातं. याच गाण्यादरम्यानचा एक वेगळाच प्रसंग हृतिकने शेअर केला आहे. या गाण्याचं चित्रीकरण करताना नेमकी किती मेहनत त्याला घ्यावी लागली याविषयी नुकतंच हृतिकने खुलासा केला आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”

आणखी वाचा : “लग्न करण्यापूर्वी…” वैयक्तिक आयुष्यातील ‘त्या’ घटनांबद्दल नवाजुद्दीन सिद्दीकी स्पष्टच बोलला

या गाण्याचं संपूर्ण श्रेय हृतिकने आदित्य चोप्रा यांना दिलं. ‘मिड-डे’च्या वृत्तानुसार एका मुलाखतीमध्ये याविषयी बोलताना हृतिक म्हणाला,”आम्ही ‘धूम अगेन’ हे गाणं सकाळी ९ पासून दुसऱ्या दिवशी १०-११ पर्यंत न थांबता शूट केलं. कारण तेव्हा दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या रायला काही कामानिमित्त बाहेर जायचं असल्याने तिला फ्लाइट पकडायची होती. त्यामुळे आमच्याकडे वेळ फारच कमी होता. मी सकाळी ९ वाजता नाचायला सुरुवात केली ते जवळ जवळ पुढच्या दिवशी सकाळी पॅकअप पर्यंत मी काम करतच होतो. या गाण्यात माझं पिळदार शरीर आणखी उठून दिसायला हवं असल्याने मी त्यावेळी पाणी किंवा अन्न काहीच घेतलं नव्हतं.”

आणखी वाचा : ‘The Kashmir files’ प्रमाणेच ‘The Kerala Story’देखील सुपरहीट ठरणार का? वाचा बिझनेस ट्रेंड काय सांगतो

पुढे हृतिक म्हणाला, “यामुळे मी इतका थकून गेलो होतो की शूट संपल्यावर मी तातडीने भरपूर चॉकलेट्स खायला मागवली. कोणाचाही विश्वास बसणार नाही पण या गाण्याच्या चित्रीकरणानंतर मी तब्बल २ बादल्याभरून चॉकलेट्स आणि जंक फूड मागवलं होतं. एवढं बाहेरचं खाणं योग्य आहे असं मी मुळीच म्हणणार नाही, पण ज्यादिवशी तुम्ही भरपूर मेहनत घेता तेव्हा सगळं काही माफ असतं.”