बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या सबा आझादबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. तो सबा आणि मुलांसह ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यासाठी परदेशात गेला आहे. हृतिक रोशनने यंदाचा ख्रिसमस गर्लफ्रेंड सबा आझाद आणि मुलं ऱ्हेहान रोशन व ह्रदान रोशनसोबत युरोपमध्ये साजरा केला. त्यांच्याबरोबर हृतिक रोशनची चुलत बहीण व अभिनेत्री पश्मिना रोशन, तसेच कुटुंबातील सदस्यही होते.
हृतिकने ख्रिसमसच्या सुट्टीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तो सबा आझाद आणि मुलं ऱ्हेहान रोशन व ह्रदानबरोबर बर्फात पोज देताना दिसत आहे. यात त्यांच्या हातात छत्र्यादेखील आहेत.”मेरी ख्रिसमस ब्युटीफूल पिपल,” असं कॅप्शन हृतिकने हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना दिलंय. रिपोर्ट्सनुसार, हृतिक आणि सबा कुटुंबासह स्वित्झर्लंडमध्ये सुट्टी घालवत आहेत.
फोटोमध्ये, हृतिक, पश्मिना, ऱ्हेहान आणि ह्रदान तसेच सबा आझाद हे स्वित्झर्लंडमध्ये बर्फाचा आनंद लुटताना काळ्या छत्री धरून हसताना आणि पोज देताना दिसत आहेत. फोटोमध्ये हृतिकचा चुलत भाऊ ईशान रोशनही दिसत आहे. त्याने फोटो शेअर केल्यानंतर, चाहत्यांनी हृतिकच्या ख्रिसमस पोस्टवर कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत. “मेरी ख्रिसमस, खूप छान,” “हा फोटो खूप क्यूट दिसतोय”, “तुम्हाला आणि तुमच्या सुंदर कुटुंबाला ख्रिसमसच्या शुभेच्छा,” अशा कमेंट्स हृतिकच्या चाहत्यांनी केल्या आहेत.