बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. सध्या हृतिक रोशन आणि सबा आझाद बॉलिवूडच्या बहुचर्चित जोड्यांपैकी एक मानले जातात. बरेचदा या दोघांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी डिनर तर कधी बॉलिवूड पार्टी असं हे दोघं सध्या बऱ्याच वेळा एकमेकांबरोबर दिसतात. नुकत्याच या दोघांच्या लिव्ह इन रिलेशनशिपबाबतच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत होत्या. यावर आता हृतिक रोशनने मौन सोडलं आहे.

हृतिकने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून एक ट्वीट करत लिव्ह इन रिलेशनशिपच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. अलिकडेच एका रिपोर्टमध्ये हृतिक रोशन आणि सबा आझाद लवकरच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार असल्याचा दावा केला होता. एवढंच नाही तर त्यासाठी हृतिकने एक आपार्टमेंटही विकत घेतल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं होतं. ज्यावर आता हृतिक रोशनने प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट करत हे सर्व रिपोर्ट केवळं अफवा असल्याचं हृतिकने म्हटलं आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Govinda daughter Tina Ahuja opens up about failed Bollywood career
बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”
keerthy suresh antony thattil wedding
नागा चैतन्य-सोभितानंतर आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली गोव्यात; पत्रिका पाहिलीत का?
mamta kulkarni is single says left vicky goswami
प्रेमामुळे करिअर संपलं, देशही सोडावा लागला; २५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी म्हणाली, “मी लग्न केलंच नाही”
niti taylor breks silence on her divorce
प्रसिद्ध अभिनेत्रीने हटवलं पतीचं आडनाव, घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच सोडलं मौन; म्हणाली…

आणखी वाचा- हृतिक रोशनने चाहत्यांकडे केली मोठी मागणी; म्हणाला, “कृपया मला…”

हृतिक रोशनने त्याच्या ट्वीटमध्ये एका बातमीची लिंक शेअर केली आहे. या बातमीत हृतिक रोशन आणि सबा आझाद यांनी एक अपार्टमेंट विकत घेतलं असून लवकरच ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही लिंक शेअर करताना हृतिकने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, “मी एक प्रसिद्ध व्यक्ती असल्याने माझ्याबद्दल सर्वकाही जाणून घेण्याची लोकांची इच्छा असते हे मी समजू शकतो. पण या वृतामध्ये कोणतंही तथ्य नाही. या केवळ अफवा आहेत. माझ्या आयुष्यात खरंच काय चाललंय हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवणं बंद कराल.”

आणखी वाचा- सबा आझादच्या ‘त्या’ पोस्टवर हृतिकच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने केली कमेंट; म्हणाली…

दरम्यान हृतिक रोशनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो आगामी काळात ‘फायटर’ या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोणसह दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका आणि हृतिक पहिल्यांदाच एकमेकांबरोबर स्क्रिन शेअर करणार आहेत. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय अलिकडेच प्रदर्शित झालेला त्याचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट बराच गाजला. विशेषतः या चित्रपटातील हृतिकच्या अभिनयचं कौतुक झालं होतं.

Story img Loader