हृतिक रोशनचा २००३ साली प्रदर्शित झालेला ‘कोई मिल गया’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केले होते. दिग्दर्शनासोबतच राकेश रोशन यांनीही या चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती. चित्रपटाची कथा खूपच अनोखी होती आणि आजही लोकांना हा चित्रपट खूप आवडतो. हा चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज २० वर्ष झाली आहेत. दरम्यान हृतिक रोशनने चित्रपटातील एका सायकल सीनबाबत एक मनोरंजक किस्सा शेअर केला आहे.

हेही वाचा- ‘असा’ शूट झाला शबाना आझमी-धर्मेंद्र यांचा ‘रॉकी और रानी…’तील किसिंग सीन, चित्रपटातील अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली…

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Fans and netizens reaction on tejashri Pradhan exit from premachi goshta serial
“खूप वाईट वाटतंय..”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील तेजश्री प्रधानच्या एक्झिटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “तुझा निर्णय…”

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हृतिक रोशनने खऱ्या आयुष्यातही त्याच्याबरोबर कोई मिल गया सारखा सायकल सीन झाला असल्याचा खुलासा केला आहे. हृतिकच्या म्हणण्यानुसार कोई मिल गया मधील रोहितचे पात्र त्याच्या खऱ्या आयुष्याशी मिळतेजुळते आहे.

हृतिक म्हणाला की, ही माझ्या शाळेच्या काळातील बाब आहे. मी लहानपणापासूनच अडखळत होतो आणि चित्रपटात दाखवल्याप्रमाणे, सगळेच लोक माझ्या अशा बोलण्याची चेष्टा करायचे. अनेकदा मी यामुळे मारही खाल्ला आहे. ‘कोई मिल गया’ या चित्रपटात ज्या सीनमध्ये गुंडांनी रोहितची स्कूटी फोडली होती, तसाच सीन माझ्यासोबत खऱ्या आयुष्यात घडला होता. काही सिनिअर मुलांनी माझी BMX सायकल तोडली, जी लहानपणी माझ्या सर्वात मौल्यवान वस्तूंपैकी एक होती. माझे हृदय तुटले, मला खूप राग आला. रोहितप्रमाणे माझ्याही आत खूप भावना भरल्या होत्या. रोहितच्या व्यक्तिरेखेतील बारकावे मी लहानपणापासूनच शिकलो होतो.

हेही वाचा- Video : अंगरक्षकांना ढकलून चाहत्याने धरला तमन्ना भाटियाचा हात; पुढे अभिनेत्रीने केले असे काही…; पाहा व्हायरल व्हिडीओ

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनचा विक्रम वेधा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर सैफ अली खानची मुख्य भूमिका होती. आता हृतिक लवकरच सिद्धार्थ आनंद यांच्या ‘फायटर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात हृतिकबरोबर दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अॅक्शनने भरलेला हा चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader