बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनला अलीकडेच संपन्न झालेल्या ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हृतिकने त्याचा बॉलीवूडमधील प्रवास ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून सुरु केला. पहिल्याच चित्रपटात अभिनेत्याने डबल रोल साकारण्यासाठी बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानकडून खास टिप्स घेतल्या होत्या. याबाबत हृतिक रोशनने बीबीसीच्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
हेही वाचा : ‘द आर्चीज’ चित्रपटाचे पोस्टर पाहून करण जोहरने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाला “मुलं किती लवकर…”
हृतिक रोशनने वयाच्या २६ व्या वर्षी ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. चित्रपटादरम्यान बॉडी बनवण्यासाठी हृतिकला फार मेहनत घ्यावी लागली. काही केल्या त्याला बॉडी बनवणे शक्य होत नव्हते शेवटी हृतिकने कंटाळून सलमान खानला कॉल केला होता.
हेही वाचा : Video : महेश मांजरेकरांच्या लेकीची ‘ती’ कृती पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक; म्हणाले “सई मराठी आहे म्हणून…”
बॉडी बिल्डिंगसाठी काय मेहनत घेतली याबाबत सांगताना, हृतिक म्हणाला, “मला याचा चांगलाच अंदाज होता की, ‘कहो ना प्यार है’ चित्रपटासाठी मला चांगली बॉडी बनवणे गरजेचे होते. पहिल्या भागात मला रोहित, तर दुसऱ्या भागात मला राजचे पात्र साकारायचे होते. दोघांमध्ये खूप फरक होता, त्यामुळे शारीरिकदृष्ट्या मला सर्वाधिक काळजी घ्यायची होती. मी सलग एक वर्ष यासाठी मेहनत घेतली होती, परंतु काही केल्या माझ्या प्रयत्नांना यश येत नव्हते.”
हृतिक रोशन पुढे म्हणाला, “मी स्वत:च विचार केला चित्रपटसृष्टीत सर्वात चांगली बॉडी कोणाची आहे? तेव्हा माझ्या डोक्यात सर्वप्रथम सलमान खानचे नाव आले. सलमानला कॉल करून मी बॉडी कशी बनवायची याविषयी टिप्स घेतल्या. त्याने मला खूप चांगले मार्गदर्शन केले.” दरम्यान, २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती.