बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा सध्याच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. त्याचा याचवर्षी प्रदर्शित झालेला ‘विक्रम वेधा’ फारसा चालला नसला तरी प्रेक्षकांनी हृतिकच्या कामाचं कौतुक केलं. नुकतंच हृतिकने एका मुलाखतीमध्ये त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. शिवाय ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून मिळालेल्या स्टारडमबद्दल, लोकप्रियतेबद्दल हृतिकने भाष्य केलं आहे.

नुकतंच हृतिकने युट्यूबवर ‘गलाट्टा प्लस’शी संवाद साधला आणि त्याच्या चित्रपटातील अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. यावर्षी आलेला हृतिकचा ‘विक्रम वेधा’ फारसा चालला नाही, दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असूनही या चित्रपटाने फारशी कमाई केलेली नाही. बॉयकॉट ट्रेंड आणि लोकांचा बॉलिवूडबद्दल निर्माण झालेला गैरसमज हे याला कारणीभूत ठरलं असलं तरी हा चित्रपट सपशेल आपटला आहे हेदेखील हृतिकने या मुलाखतीमध्ये मान्य केलं आहे.

chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Abhishek Bachchan
अभिषेक बच्चनचं ‘ते’ वाक्य अन् अमिताभ बच्चन म्हणाले, “तुला शोमध्ये बोलवून चूक केली”; नेमकं काय घडलं?
love lagna locha new marathi movie
‘Love लग्न लोचा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! चित्रपटात दमदार कलाकारांची मांदियाळी, प्रमुख भूमिकेत झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी…
Guddi Maruti reveals shocking details about Divya Bharti death
“तोंड रक्ताने माखलेली एक…”, दिव्या भारतीच्या निधनाबद्दल बॉलीवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा; तिला पडताना ‘या’ व्यक्तीने पाहिल्याचा केला दावा
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Aai kuthe kay karte fame madhurani prabhulakar got emotional sharing her old memories of the serial
‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, मधुराणी प्रभुलकर झाली भावुक; म्हणाली, “प्रत्येक स्त्रीचा आरसा असणारी भूमिका…”
Fandry Fame Somnath Awaghade And Rajeshwari Kharat
गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा अन्…; ‘फँड्री’तील जब्या-शालूचा नवा फोटो चर्चेत; नेटकरी म्हणाले, “खरंच लग्न झालं का…”

आणखी वाचा : “सर्वात यशस्वी महिला निर्माती…” विवेक अग्निहोत्री यांनी केलं पत्नीचं कौतुक; मात्र पल्लवी जोशी झाली नाराज

चित्रपटसृष्टीत मिळालेलं स्टारडम आणि लोकप्रियता याबद्दलही हृतिकने या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. तो म्हणाला, “एक अभिनेता म्हणून मी प्रेक्षकांना उत्तर द्यायला बांधील आहे आणि माझ्या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव आहे. मला मिळालेली लोकप्रियता म्हणजेच स्टारडम ही सर्वात मोठी भेटवस्तू आहे आणि माझ्या डोक्यावर त्याचं ओझं कायम असतं. यासाठी मला प्रचंड मेहनतही घ्यावी लागते, कारण मला प्रेक्षकांच्या स्मरणात राहायचं आहे, याच क्षेत्रात मला पुढे प्रगती करायची आहे.”

याबरोबरच या मुलाखतीमध्ये हृतिकने त्याच्या आवडत्या चित्रपटाबद्दलही खुलासा केला आहे. ‘कोई मिल गया’ हा हृतिकला त्याचा सर्वात आवडलेला चित्रपट आहे. हृतिक रोशन आणि अमीषा पटेलच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटामुळे हृतिक रातोरात स्टार झाला.