सध्या हृतिक रोशनच्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासह सैफ अली खान प्रमुख भूमिकेमध्ये आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक तीन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतला. २०१९ मध्ये त्याचा ‘वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सिनेसृष्टीतील करिअरप्रमाणे त्याचे खासगी आयुष्यही सतत चर्चेत असते. २०२० मध्ये त्याचा घटस्फोट झाला. काही दिवसांपासून तो अभिनेत्री आणि गायिका सबा आझादला डेट करत आहे.

हृतिक सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. तो इन्स्टाग्राम सतत काही ना काही पोस्ट करत असतो. गुरुवारी रात्री त्याने एक सेल्फी शेअर केला. या फोटोमध्ये तो लांबून सेल्फी काढत आहे आणि त्याची कथित प्रेयसी सबा लाकडाच्या बेंचवर बसलेली आहे असे दिसते. या फोटोला हृतिकने ‘लाकडाच्या बेंचवर बसलेली मुलगी, उन्हाळा २०२२, लंडन, व्हॅन गॉगचा विलक्षण अनुभव’, असे कॅप्शन दिले आहे.

actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
priyanka chopra
लेक आणि पतीसह प्रियांका चोप्राची न्यूयॉर्क ट्रिप! चिमुकल्या मालतीला लावली खोटी नखं; फोटो व्हायरल
ranveer allahbadia dating actress nikki sharma
प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाने शेअर केला गर्लफ्रेंडचा फोटो? ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चाहत्यांनीच केला खुलासा
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO
Monkey hugs Shashi Tharoor, falls asleep on his lap
Shashi Tharoor : माकडानं शशी थरुरांना मिठी मारुन कुशीत काढली एक डुलकी, फोटो व्हायरल

आणखी वाचा – Bigg Boss 16: …अन् सर्वांसमोर शालीनने सौंदर्या शर्माला केलं Kiss; दोघांची जवळीक पाहून गौतम भडकला

त्यांच्या हा सेल्फी खूप व्हायरल झाला आहे. हा फोटो नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. पण याचबरोबर काही युजर्सनी मात्र या फोटोवरून ट्रोलही केलं आहे. एका यूजरने ‘भूक लागली असेल काहीतरी खायला द्या रे’, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या यूजरने फोटोच्या कमेंट बॉक्समध्ये ‘यामुळे तुमचे चित्रपट चालत नाही’, असे म्हटले. तसेच ‘बिर्याणी आणि त्यातली इलायची’ असे म्हणत एकाने सबाला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा – अमेरिकेत प्रियांकाने ‘या’ पद्धतीने साजरा केला करावा चौथ! फोटो चर्चेत

सबा आणि हृतिक अनेकदा बॉलिवूड पार्ट्यांमध्ये, एअरपोर्टवर एकत्र दिसतात. आतापर्यंत दोघांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सबा देखील सिनेक्षेत्रामध्ये कार्यरत आहे. २००८ मध्ये ‘दिल कबड्डी’ या चित्रपटाद्वारे तिने पदार्पण केले. सोनी लाइववरील ‘रॉकेट बॉईज’ या प्रसिद्ध वेब सीरिजमध्ये ती झळकली होती.

Story img Loader