अभिनेता हृतिक रोशन बॉलिवूडमधील हॅण्डसम हंक म्हणून ओळखला जातो. ९०च्या दशकात सिक्स पॅक्सने त्याने तरुणाईला वेड लावलं होतं. पन्नाशीच्या उंबरठ्यावरही हृतिकचा फिटनेस कायम आहे. नुकतंच हृतिकने एका फिल्म फेस्टिवलला हजेरी लावली. यावेळी त्याने ‘करण अर्जुन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा शेअर केला.

‘करण अर्जुन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हृतिक रोशनचे वडील व बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन यांनी केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची आठवण शेअर करत हृतिक म्हणाला “करण अर्जुन चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान माझे वडील रोज सगळ्यांना सकाळी लवकर उठवायचे. ते सकाळी ५ वाजता उठायचे आणि सगळ्यांच्या रुमचे दरवाजे ठोठवायचे. मग तो शाहरुख खान असो अथवा सलमान खान”.

aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
ranveer singh share joy after being father
Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”

हेही वाचा>>“मला गरोदरपणाची…” राम चरणच्या पत्नीने आई होण्याबाबत केलेलं वक्तव्य होतं चर्चेत

“माझे वडील सगळ्यांना उठवून ही कामाची वेळ आहे, असं म्हणायचे. ते वेळेचे फार पक्के आहेत. उशीर करणारे लोक त्यांना आवडत नाहीत. ते स्वत: कधीच कोणत्याही ठिकाणी उशीरा पोहोचत नाहीत. त्यांच्यातील हा वक्तशीरपणा माझ्यातही आहे. त्यामुळे सगळ्या ठिकाणी, कार्यक्रमांना मी वेळेतच पोहोचतो”, असंही पुढे हृतिकने सांगितलं.

हेही वाचा>> “…अन् १५ सेकंदात सर्रकन भूतकाळ माझ्या डोळ्यासमोरून गेला” प्रसाद खांडेकरची पोस्ट चर्चेत

२००० साली हृतिकने ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने एक सो एक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले. तो सध्या सबा आझादसह रिलेशनशिपमध्ये आहे.