बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन आज त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. तो त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. लवकरच हृतिक दीपिका पदुकोणसोबत ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे. तर त्याचबरोबर यावर्षी तो त्याची गर्लफ्रेंड सबा आझादशी लग्न करण्याच्या तयारीत आहे असंही समोर आलं आहे.

हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेकदा एकत्र दिसले. कधी पार्टीमध्ये तर कधी दोघेही सुट्टीचा आनंद लुटताना दिसतात. हृतिकच्या चाहत्यांनाही दोघांची जोडी आवडते आणि अशा परिस्थितीत आता हृतिक आणि सबा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. हृतिक रोशनचे कुटुंबही सबा आणि त्याच्या नात्याबद्दल खूप खुश आहे. इतकंच नाही तर हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान आणि त्यांची दोन्ही मुलं यांचेही सबाशी चांगले संबंध आहेत.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Muslim father card printed for hindu people at daughter wedding faces of hindu lord in amethi goes viral
PHOTO: मुस्लिम बापाकडून लेकीच्या लग्नात हिंदूंसाठी खास निमंत्रण; पत्रिकेवरील एका गोष्टीनं वेधलं लक्ष; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका

आणखी वाचा : Video: “मुंबई पोलीस या लोकांना का पकडत नाहीत?”; सैफ-करीनाच्या बेजबाबदारपणावर नेटकरी संतापले

हेही वाचा : कौतुकास्पद! हृतिक रोशन बनला सैन्यातील अधिकाऱ्यांचा सांताक्लॉज, त्यांना दिली ‘ही’ खास भेट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृतिक आणि सबा हे दोघेही त्यांच्या लग्नाचं प्लॅनिंग करत आहेत. पण त्यात त्यांना कोणतीही घाई करायची नाही. सध्या दोघेही त्यांच्या कामात व्यस्त आहेत आणि त्यांना आपापल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस ती दोघं लग्नगाठ बांधणार आहेत. तसंच लग्नानंतर सुट्टीवर जाणार आहे. हे लग्न अजिबात भव्य होणार नाही आणि सुझान खानसह फक्त हृतिकचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत, असं हृतिकच्या एका जवळच्या व्यक्तीने मीडियाला सांगितलं.