२०१७ च्या ‘काबिल’ चित्रपटात हृतिक रोशनबरोबर स्क्रीन शेअर करणारा बॉलिवूड अभिनेता रोनित रॉय याने अलीकडेच सेटवरील काही आठवणी शेअर केल्या आहेत. हृतिकला वर्षानुवर्षे ओळखत असूनही, रोनितने यापूर्वी कधीही त्याच्याबरोबर काम केले नव्हते आणि जेव्हा तो चित्रपटासाठी निवडला गेला झाला तेव्हा त्याने एक औपचारिक नाते कायम ठेवायचे ठरवले आणि तो हृतिकला ‘सर’ म्हणून हाक मारत असे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हृतिकला हे अजिबात पटले नव्हते आणि त्याने दुसर्‍या दिवशीच रोनित रॉयच्या या वागण्यावर आक्षेप घेतला होता. लेहरेन रेट्रोला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रोनितने खुलासा केला की दुसऱ्या दिवशी त्याला हृतिकच्या व्हॅनमध्ये बोलावण्यात आले होते, सर्वप्रथम त्याचे कारण त्याला ठाऊक नव्हते. अगदी खासगीत संवाद साधतानाही ‘सर’ म्हणून हाक मारण्याबद्दल आपली अस्वस्थता हृतिकने रोनितकडे व्यक्त करून दाखवली आणि सांगितले की यामुळे त्यांच्या मैत्रीच्या नात्यात अडथळा निर्माण होत आहे.

आणखी वाचा : ४ महीने कठोर परिश्रम, गोड पदार्थांचा त्याग अन्…; ‘अ‍ॅनिमल’मधील बॉबी देओलच्या रावडी लूकमागील रहस्य जाणून घ्या

रोनितने ‘डुग्गु’ या टोपणनावानेच आपल्याला हाक मारावी असा आग्रहच हृतिकने केला, कारण याबद्दल त्यांनी आधीही चर्चा केली होती. रोनितने हृतिकच्या स्पष्ट स्वभावाचे प्रचंड कौतुक केले. यामुळे रोनितच्या मनावरीलही दडपण थोडे कमी झाले अन् सेटवरील वातावरणही अगदी खेळीमेळीचे झाल्याचं रोनितने या मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं.

हृतिकचा ‘काबिल’ हा चित्रपट २०१७ मध्ये शाहरुख खानच्या ‘रईस’बरोबर प्रदर्शित झाला होता. शाहरुखसारखा तगडा खिलाडी समोर असतानाही हृतिकच्या चित्रपटाने तेव्हा जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटात हृतिकसह यामी गौतम ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत होती. चित्रपटात रोनित हा खलनायकाच्या भूमिकेत होता अन् त्याच्याबरोबर रोहित रॉयसुद्धा यात महत्त्वाच्या भूमिकेत होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik was very uncomfortable because of ronit roys this gesture on the sets of kaabil avn