प्रसिद्ध उद्योगपती अंबानींच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’चं काही दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आलं. या सोहळ्याला बॉलिवूडमधील सिनेतारकांनी हजेरी लावली होती. अभिनेता हृतिक रोशनही त्याची गर्लफ्रेंड साबा आझादसह या सोहळ्याला उपस्थित होता. या सोहळ्यादरम्यानचा हृतिकचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इन्संट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन हृतिकचा अंबानींच्या सोहळ्यातील एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये हृतिकच्या हातात गर्लफ्रेंड साबाचे हाय हिल्स दिसत आहेत. हृतिकचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवर कमेंट करत अनेकांनी हृतिकचं कौतुक केलं आहे. तर काहींनी त्याला ट्रोलही केलं आहे.
हेही वाचा>> Video: मधुर भांडारकरांची निर्मिती अन् वैभव-ऋताची फ्रेश जोडी, ‘सर्किट’ चित्रपटाच्या टीमशी दिलखुलास गप्पा
“बायकोची एवढी काळजी घेतली असती तर असं झालं नसतं” असं एकाने म्हटलं आहे.
“सुझानची एवढी काळजी घेतली असतीस तर तुमचं नात अजूनही चांगलं असतं”, अशी कमेंट केली आहे.
“कधी बायकोची चप्पल उचलली होतीस का? ” असंही एकाने म्हटलं आहे. “बायकोची चप्पल का नाही उचलली”, अशी एकाने कमेंट केली आहे.
हृतिकने २०००मध्ये सुझान खानशी लग्न केलं होतं. त्यांना दोन मुले आहेत. १४ वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. २०१४ साली सुझान खानशी घटस्फोट घेतल्यानंतर आता हृतिक सबा आझादबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.