Huma Qureshi Angry On Babil Khan: १३ मार्चला मुंबईत वर्ल्ड मॅगझीनच्या कॉस्ट्यूम फॉर कॉज गाला कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला बॉलीवूडच्या बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमात सेलिब्रिटी हटके लूक पाहायला मिळाले. तनिषा मुखर्जी, वामिका गबी, हुमा कुरेशी, सनी लिओनी, रसिका दुग्गल असे बरेच जण अतरंगी लूकमध्ये दिसले.

या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, हुमा कुरेशी ( Huma Qureshi ) व इरफान खानचा मुलगा बाबिल खानच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बाबिल खानने असं काही केलं, ज्यामुळे हुमा संतापलेली पाहायला मिळाली आणि तिने थोबाडीत मारण्याची इच्छा व्यक्ती केली. हुमा कुरेशी व बाबिल खानमध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

हुमा कुरेशी ( Huma Qureshi ) व बाबिल खानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बाबिल हुमाला सांगतो की, त्याने माझा फोन उचलला नाही. तेव्हा हुमा ही चर्चा संपवण्यासाठी म्हणते, “याविषयी आपण नंतरला बोलू.” पण तरीही बाबिल विचारतो, “तो माझ्यावर रागवला आहे का?” यावर हुमा बाबिलला दुर्लक्ष करत म्हणते, “मला माहीत नाही. सॉरी.” त्यानंतर बाबिल तिथून निघून जातो आणि हुमा एका मैत्रिणीला सांगत म्हणते की, मला या मुलाला थोबाडीत मारायची खूप इच्छा आहे.

दरम्यान, हुमा कुरेशीच्या ( Huma Qureshi ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती अक्षय कुमार आणि अरशद वारसीबरोबर कोर्टरुम ड्राम ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. तसंच दाक्षिणात्य सुपरस्टार यशबरोबर ‘टॉक्सिक’ चित्रपटातही हुमा झळकणार आहे. याशिवाय हुमा विपुल गोयल दिग्दर्शित ‘गुलाबी’ आणि एक इन्वेस्टिगेटिव ड्रामा ‘बयान’मध्ये काम करणार आहे.

तसंच बाबिल खानबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं २०२२मध्ये ‘काला’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. लवकरच तो ‘लॉगआउट’मध्ये पाहायला मिळणार आहे. जो रोमांचक मिस्ट्री ड्रामा आहे आणि यामध्ये रसिक दुग्गल आहे. ‘लॉगआउट’चं प्रीमियर १८ एप्रिलला ‘जी ५’वर होणार आहे.