सध्या आपल्या ‘तरला’ चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या हुमा कुरेशीने ‘गॅन्ग्ज ऑफ वासेपूर’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हुमाला इंडस्ट्रीमध्ये जवळपास ११ वर्षे झाली आहेत. तिने आतापर्यंत अनेक चित्रपट व सीरिजमध्ये काम केलंय आणि आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. पण, पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हरवल्यासारखं वाटू लागलं होतं, असा खुलासा हुमाने केला आहे. तसेच तिने ‘गॅन्ग्ज ऑफ वासेपूर’साठी किती मानधन मिळालं होतं, त्याबद्दलही सांगितलं आहे.

‘नीयत’ व ‘७२ हूरें’ दोन्ही ठरले फ्लॉप, रविवारीही प्रेक्षकांनी चित्रपटांकडे फिरवली पाठ, कमाईचे आकडे निराशाजनक

एका मुलाखतीत हुमाने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या समस्यांबद्दल सांगितलं. हुमा म्हणाली, “मला खूप आधीच यश मिळालं होतं. २०१० मध्ये मी मुंबईला गेले आणि २०१२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो भारतात खूप गाजला पण माझे जग उद्ध्वस्त झाले होते. चित्रपट प्रदर्शित झाला आणि हिट झाला, तेव्हा काय घडत आहे हेच समजत नव्हतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मी म्हणाले, ‘वाह! मी चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे का? माझा चेहरा होर्डिंगवर आहे, यासाठी मला जास्त पैसे मिळायला हवे होते का? असे चित्रपट बनतात का? असे प्रश्न मला पडू लागले होते. तसेच ‘गॅन्ग्ज ऑफ वासेपूर’ हा एक खास अनुभव होता आणि हा एक आयुष्य बदलणारा चित्रपट होता, कारण या चित्रपटानंतर मी हरवले होते, असुरक्षित झाले होते,” असं तिने सांगितलं.

“या चित्रपटासाठी मला फक्त ७५ हजार रुपये मानधन मिळाले होते. मी व्हायकॉम १८ बरोबर काम करत होते, ते चित्रपटाचे निर्माते होते, तो माझा पहिलाच चित्रपट होता आणि त्यात काहीही फॅन्सी नव्हते. तिथे कोणतेही पंचतारांकित हॉटेल नव्हते, व्हॅनिटी व्हॅन नव्हती किंवा मागेपुढे फिरणारे लोक नव्हते, फक्त एक ग्रुप होता जो तीन महिन्यांसाठी वाराणसीला गेला होता आणि शूटिंग करून परत आला होता,” असं हुमाने ‘गॅन्ग्ज ऑफ वासेपूर’च्या शुटिंगबद्दल सांगितलं.

Story img Loader