२०१२ मध्ये ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या हुमा कुरेशीने आपल्या पहिल्याच चित्रपटात अविस्मरणीय अभिनय करत प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. नुकतंच एका मुलाखतीत हुमा कुरेशीने ‘गँग्स ऑफ वासेपूर’ रिलीज झाल्यानंतरची एक आठवण सांगितली. तिच्या पहिल्या सिनेमानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्याशी तिची अचानक भेट झाली होती. याच भेटीत डेव्हिड धवन यांनी हुमाला एक सल्ला दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत हुमा म्हणाली, “‘गँग्स ऑफ वासेपूर’ नंतर मी एका कॉफी शॉपमध्ये डेव्हिड धवन यांना भेटले. त्यांना समोर पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी स्वतःहून माझ्याकडे येऊन मला एक सल्ला दिला होता. तो सल्ला माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता.”

हेही वाचा…वडील घरी आले की घाबरून लपायचो, ऋषी कपूर कारण सांगत म्हणालेले, “ते खोलीत…”

हुमा पुढे म्हणाली, “त्यांनी मला म्हटलं, ‘बेटा, तू खूप चांगली अभिनेत्री आहेस. तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण असं काहीही करू नकोस. प्रेक्षकांनी तुला स्वीकारलं आहे, त्याचं महत्त्व समजून घे. तुला फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे.”

हुमा या मुलाखतीत म्हणाली, “त्यांनी दिलेला सल्ला मला खूप भावला. सिनेसृष्टीतील ज्येष्ठांकडून मिळालेला असा सल्ला खूप मोलाचा असतो,” असे हुमा म्हणाली. “तो सल्ला मी लिहून ठेवला.”

हेही वाचा…Video : छोट्या चाहत्यासाठी रस्त्यात थांबला सोनू निगम, टॅलेंटचं कौतुक केलं अन्…; त्याच्या ‘या’ कृतीचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक

हुमाने याच मुलाखतीत शरीराच्या नैसर्गिक रचनेबाबत तिचे विचार मांडले. ती म्हणाली, “आपल्या देशात प्रत्येकाला दुसऱ्याच्या सौंदर्याबद्दल आकर्षण असतं, स्वतःबद्दल अनेकांना समाधान नसतं. जर तुम्ही नाकाची सर्जरी करून त्याचा आकार सुधारणार असाल तर नाक सुधारताना तुमची हनुवटी बिघडू शकते. लोकांना त्यांच्या नैसर्गिक रुपात राहू द्या”, असं हुमा म्हणाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huma qureshi recalls david dhawan inspiring advice on body weight after gangs of wasseypur release psg