संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्याने खळबळ उडवून दिली. काहींना हा चित्रपट आवडला तर अनेकांनी त्यावर टीकाही केली. जावेद अख्तर आणि स्वानंद किरकिरे यांनीही ‘अॅनिमल’वर टीका केली. हिंसाचार आणि महिलांबद्दलच्या दृष्टिकोनापासून ते गैरवर्तन आणि वादग्रस्त संवादांपर्यंत चित्रपटात वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या ज्यांची चांगलीच चर्चा झाली. मध्यंतरी बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूनेही‘अॅनिमल’वर प्रतिक्रिया दिली होती.
तापसीने प्रतिक्रिया दिलीच पण याबरोबरच ती असे चित्रपट कधीच करणार नाही असेही तिने वक्तव्य केले होते. परंतु अभिनेत्री हुमा कुरेशीने मात्र एकदाम वेगळंच वक्तव्य केलं आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. हुमाला ‘अॅनिमल’ प्रचंड आवडला असून तिने त्याबद्दलच भाष्य केलं आहे. ‘इंडिया टूडे’शी संवाद साधतांना हुमाने चित्रपटाची प्रचंड प्रशंसा केली.
आणखी वाचा : Video: पॉर्नस्टार जॉनी सीन्सबरोबर रणवीर सिंगची ‘ती’ जाहिरात चर्चेत; पुरुषांच्या गंभीर समस्येवर केलं भाष्य
हुमा म्हणाली, “मला हा चित्रपट प्रचंड आवडला अन् मी त्याचा पूर्ण आनंद घेतला. त्यातलं संगीत, अॅक्शन, मर्दानगी मला प्रचंड भावली. इतर चित्रपटांप्रमाणेच या पठडीतले चित्रपटही बनायला हवेत. एक प्रेक्षक म्हणून तुम्ही ठरवू शकता हा चित्रपट पाहायचा की नाही. मला तर अशा चित्रपटात काम करायला फार आवडेल जिथे एक मशीन गन घेऊन मी हजारो लोकांना यमसदनी धाडत आहे. एक कलाकार म्हणून अशा चित्रपटाचा भाग होणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. जेव्हा मी ‘वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट’ किंवा ‘अॅनिमल’सारखे चित्रपट पाहते तेव्हा एक कलाकार म्हणून त्या भूमिका निभावताना काय अनुभवायला मिळेल याचा मी अंदाज लावू शकते.”
चित्रपटावर होणाऱ्या दुतर्फी वादावरही हुमाने भाष्य केलं आहे. ती पुढे म्हणाली, “जर चित्रपटाचा परिणाम खरंच आपल्या समाजावर पडतोय याचा अर्थ आपण फार चांगले चित्रपट काढत आहोत अन् आता समाज सुधरायला हवा. पण तसं होताना दिसत तर नाहीये. जर समाज सुधारला नाहीये याचाच अर्थ तो अशा चित्रपटामुळे बिघडणारही नाही. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की ‘अॅनिमल’सारखे चित्रपटही बनवा आणि ‘महाराणी’सारख्या वेबसिरिजही बनवा. लोकांना जे पाहायला आवडलं ते लोक बरोबर निवडतील.” हुमा कुरेशीच्या ‘महाराणी’ या सीरिजची चर्चा सध्या प्रचंड आहे. लवकरच या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.