अभिनेत्री हुमा कुरेशी बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. हुमाने आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. तिचा ‘तरला’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये हुमा व्यग्र आहे. आपल्या अभिनयाबरोबरच हुमा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. नुकतंच तिने बॉलिवूडमध्ये मुस्लिमांबरोबर भेदभाव होतो का? याबद्दल भाष्य केलं.
नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान हुमा कुरेशीला बॉलिवूडमध्ये मुस्लिमांशी भेदभाव केला जातो का, असं विचारण्यात आलं. यावर अभिनेत्रीने स्पष्ट उत्तर दिले. हुमाने ‘आज तक’च्या ‘सीधी बात’ शोमध्ये हजेरी लावली. याठिकाणी तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले व तिने त्या प्रश्नांची उत्तरंही दिली. यावेळी इंडस्ट्रीत कलाकारांशी धर्मावरून भेदभाव केला जातो का? असं विचारण्यात आलं. यावर हुमा म्हणाली, ‘आजही जेव्हा अशा गोष्टी बोलल्या जातात, तेव्हा लोक असं नेमकं का बोलतात? असा प्रश्न मला पडतो.’
“शाळेत राडे झाले होते”, माधुरी पवारने सांगितला पहिल्या लव्ह लेटरचा किस्सा; म्हणाली, “मुलाचं नाव…”
पंतप्रधान मोदी नुकतेच अमेरिकेला गेले होते, तेव्हा त्यांना अमेरिकन मीडियाने भारतातील मुस्लिमांच्या हक्कांबद्दल प्रश्न विचारले होते. याबद्दल विचारलं असता हुमा म्हणाली, “भारतात राहत असताना मला कधीच वाटलं नाही की मी मुस्लीम आहे, मी वेगळी आहे. माझे वडील गेली ५० वर्षे ‘सलीम’ नावाचे रेस्टॉरंट चालवत आहेत. वैयक्तिकरित्या मला असं कधीच वाटलं नाही, परंतु काही लोकांना वाटू शकतं. त्यामुळे प्रश्न विचारले पाहिजेत आणि प्रत्येक सरकारने उत्तरंही दिली पाहिजेत.”