Pranitha Subhash announces second pregnancy: दाक्षिणात्य तसेच बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री प्रणिता सुभाषने (Pranitha Subhash) तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. प्रणिताने तिच्या इन्स्टाग्रामवर बेबी बंपचे फोटो शेअर करत ती गरोदर असल्याची माहिती दिली आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करून चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.

२०२१ मध्ये आलेल्या ‘हंगामा २’ चित्रपटात शिल्पा शेट्टीबरोबर (Shilpa Shetty) काम करणारी अभिनेत्री प्रणिता सुभाषने २५ जुलै रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बेबी बंपचे फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करताना तिने एक कॅप्शन लिहिलं आणि ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं सांगितलं. “राऊंड २… पँट अजिबात फिट होत नाही,” असं कॅप्शन तिने लिहिलं आहे. अभिनेत्रीने ही गुड न्यूज शेअर करताच सोशल मीडियावर चाहते कमेंट्स करून तिचे अभिनंदन करत आहेत.

Police solve problem of relationship between daughter mother and mothers boyfriend
मुलगी आणि प्रियकराच्या नात्यात अडकले आईचे मन, अखेर मुलीनेच…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Woman with baby in babys belly gives birth safely
‘फिट्स इन फिटू’ : ‘त्या’ महिलेची प्रसूती सुखरूप! पोटातील बाळाची शस्त्रक्रिया…
Viral Girl Monalisa in Kumbhmela
Monalisa : व्हायरल गर्ल मोनालिसाला मिळाला हिंदी चित्रपट, ‘या’ दिग्दर्शकाने घरी जाऊन घेतली भेट
shazahn padamsee got engaged to Ashish Kanakia
बॉलीवूड अभिनेत्रीने ३७ व्या वर्षी ‘या’ कंपनीच्या CEO बरोबर गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो पाहिलेत का?
Sana Khan reveals name of her son shares first family photo
सना खान दुसऱ्यांदा झाली आई, फोटोंमध्ये दाखवली धाकट्या मुलाची झलक; नावही केलं जाहीर
mamta kulkarni took sanyas
२५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी पोहोचली महाकुंभमध्ये, अभिनेत्री होणार ‘या’ आखाड्याची महामंडलेश्वर
karan veer mehra second wife got married
करण वीर मेहराच्या दुसऱ्या बायकोने केलं लग्न, अभिनेत्रीने मंदिरात बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

पाकिस्तानी महिला नेत्याबरोबरचा मुकेश अंबानी यांचा फोटो व्हायरल, तिच्या पतीने कॅप्शनमध्ये लिहिलं…

फोटोंमधील प्रणिता सुभाषच्या लूकबद्दल बोलायचं झाल्यास तिने निळ्या जीन्सबरोबर काळी मोनोकिनी घातली आहे. तिच्या जीन्सचे बटण उघडे असून ती तिच्या बेबी बंपवर हात ठेवून पोज देताना दिसत आहे.

“जेव्हा मला समजलं की…”, मूल नसण्याबाबत शबाना आझमींनी केलेलं वक्तव्य; बाळ दत्तक घेण्याबद्दल म्हणालेल्या…

प्रणिता सुभाषने तीन वर्षांपूर्वी केलं लग्न

प्रणिता सुभाषने (Pranitha Subhash husband) तीन वर्षांपूर्वी ३० मे २०२१ रोजी बंगळुरूतील एका बिझनेसमनशी लग्न केलं. तिच्या पतीचे नाव नितीन राजू आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या लग्नाची माहिती देऊन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता, कारण तिने गुपचूप लग्न केलं होतं. लग्नानंतर वर्षभरात तिने आनंदाची बातमी दिली होती. २०२२ मध्ये प्रणिताने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता तिने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Pranitha Subhash baby
प्रणिता सुभाष व तिची दोन वर्षांची लेक (फोटो – इन्स्टाग्राम)

“माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय”, अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यावर जया यांच्या वडिलांनी व्याहींजवळ व्यक्त केलेल्या भावना

प्रणिता सुभाषचे चित्रपट

दरम्यान, प्रणिता सुभाषच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास तिने २०१० मध्ये ‘बावा’ या चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर, ती २०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘अत्तरिंटिकी दरेडी’ आणि २०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘ब्रह्मोत्सवम’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. ती शेवटची कन्नड रोमँटिक कॉमेडी ड्रामा फिल्म ‘रमन्ना अवतार’ मध्ये दिसली होती. हा सिनेमा यावर्षी प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री आणि उद्योजिका प्रणिता सुभाष हिने कन्नड, तमिळ, हिंदी, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Story img Loader