अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. सोशल मीडियावर ही गाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या गाण्यांना प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पसंत करत आहेत. सलमानला बॉलिवूडमध्ये भाईजान नावानेही ओळखले जाते. पण तो नेमका कोणाचा भाईजान आहे याचा सलमानने नुकताच उलघडा केला आहे.

हेही वाचा- VIDEO : बॉक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॉप का होतात? सलमान खानने मांडलं मत, म्हणाला, “खराब चित्रपट…”

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

सलमान नुकत्याच एका पत्रकार परिषदेत सहभागी झाला होता. या परिषदेत एका महिला पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला सलमान तू संपूर्ण भारताचा भाईजान आहेस. तूला ज्या धमक्या मिळत आहेत त्याकडे तू कसा बघतोस? त्यावर सलमान म्हणाला, “मी संपूर्ण भारताचा भाईजान नाही. काहींचा जान आहे मी. अनेक जणांचा जान आहे मी. मी त्या व्यक्तींसाठी भाईजान आहे ज्यांचा मी भाऊ आहे आणि त्या मुलींसाठी ज्यांनी मी बहीण बनवू इच्छितो”. सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढली आहे. अनेक बिग बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्याचे पहायला मिळालं आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॉप का ठरतात याबाबत सलमानने मत व्यक्त केलं आहे. सलमानच्या मते, आजकाल चुकीचे चित्रपट बनवले जात आहेत. त्यामुळेच ते बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरतात. चित्रपट निर्मात्यांना वाटते की ते उत्तम चित्रपट बनवत आहेत, पण तसे नाही. ‘हिंदी चित्रपट चालत नाहीत, हे मी खूप दिवसांपासून सांगत आहे. वाईट चित्रपट बनवले तर कसे चालतील? आता हे प्रत्येकाच्या मनात आहे, प्रत्येकाला वाटते आपण ‘मुगल-ए-आझम’, ‘शोले’, ‘हम आपके है कौन’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया’ सारखे सुपरहिट चित्रपट बनवत आहोत. पण तसं नाहीये. आजच्या दिग्दर्शकांना वाटते की ते मस्त पिक्चर काढतील. पण असे होताना दिसत नसल्याचेही सलमान म्हणाला.

हेही वाचा- Video : रविना टंडनच्या मुलीला विमानतळावर धक्काबुक्की; नाराजी व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

सलमानचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट फरहाद सामजी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचा निर्माता सलमान खान आहे. हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. या चित्रपटात राघव जुयाल, शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम आणि जस्सी गिलसारखे स्टार्स देखील आहेत. सलमान खान आणि पूजा हेगडे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच सलमानचा ‘टायगर ३’ चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader