हृतिक रोशन व दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘फायटर’ चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पण तो वादात सापडला आहे. भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्याने या चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या चित्रपटात हृतिक आणि दीपिका वायूसेनेच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसत आहेत आणि त्यांचे काही किसिंग व इंटिमेट सीन आहेत.
पाकिस्तानने केलेला पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताने शेजारील देशावर केलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ‘फायटर’ भाष्य करतो. यात हृतिक स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानियाच्या भूमिकेत आहे, तर दीपिका स्क्वाड्रन लीडर मिनी राठौरच्या भूमिकेत आहे.
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, वायु सेनेच्या गणवेशात असताना मुख्य कलाकार हृतिक व दीपिकाच्या किसिंग सीनवर वायुसेनेच्या अधिकाऱ्याने नाराजी व्यक्त केली आणि चित्रपटाच्या टीमला कायदेशीर कारवाईसाठी नोटीस पाठवली आहे. दोन्ही कलाकार वायू सेनेच्या गणवेशात असताना असे सीन शूट करणे हे गणवेशाच्या प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा अनादर करणे आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
केसाच्या तेलाची जाहिरात करतेस, मग पतीच्या डोक्याला का लावलं नाही? जुही चावला म्हणाली, “त्यांचे हाल…”
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी २२.५ कोटी रुपये कमावले होते. प्रजासत्ताक दिन व शनिवार- रविवारचा वीकेंड यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. फायटरने १२ दिवसांत भारतात एकूण २१७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, तलत अजीज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.