सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान नेहमीच चर्चेत असतो. इब्राहिम आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीला अनेकदा एकत्र बघण्यात आले आहेअलीकडेच इब्राहिम सनी देओलच्या ‘गदर २’ च्या सक्सेस पार्टीमध्ये बहीण सारा अली खानसोबत दिसला होता. इब्राहिम लवकरच बॉलीवूडमध्ये पदापर्ण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र बॉलीवूडमध्ये पदापर्ण कऱण्याअगोदरच इब्राहिमला दुसऱ्याही चित्रपटाची ऑफर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी इब्राहिम अली खानला आणखी एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर आली आहे. दिनेश व्हिजनच्या मॅडॉक फिल्म्समध्ये इब्राहिम दिसणार आहे. हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट असेल, ज्याचे दिग्दर्शन कुणाल देशमुख करणार आहे. ‘दिलर’ असे या चित्रपटाचे नाव सांगितले जात आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, इब्राहिमला या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली असून त्याने यासाठी होकार दिला आहे. मात्र, आतापर्यंत इब्राहिम किंवा दिग्दर्शकाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
इब्राहिम लवकरच मल्याळम चित्रपट ‘हृदयम’च्या हिंदी रिमेक चित्रपटातून बॉलीवूड करिअरची सुरुवात करणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन कयोज इराणी करत आहेत. इब्राहिम व्यतिरिक्त या चित्रपटात काजोल, पृथ्वीराज सुकुमारन आणि राजेश शर्मा यांसारखे अनेक मोठे कलाकार आहेत.
इब्राहिम अली खानने नुकतेच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता या चित्रपटाने ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.