लाखो तरुणींच्या हृदयाचा चुकवणारा अभिनेता हृतिक रोशन नेहमीच चर्चेत असतो. त्याने २००० साली ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि रातोरात तो प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याचा डॅशिंग लूक आणि डान्सिंग स्टाइलवर करोडो चाहते आहेत. मात्र हृतिकला अनेकदा टीकेलाही समोरे जावे लागले आहे. हृतिकचे वडील अभिनेते आणि चित्रपट निर्माते राकेश रोशन यांनी एका मुलाखतीत याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.
हेही वाचा- ‘ताली’तील लूक बघून सुश्मिता सेनला ‘या’ नावाने हाक मारत होते लोक; अखेर वैतागून अभिनेत्रीने….
राकेश रोशन यांनी याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. राकेश रोशन म्हणाले, जेव्हा हृतिक अभिनेता म्हणून सुरुवात करत होता तेव्हा एक पत्रकार माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, तुम्हाला तर केस नाहीत तुमच्या मुलाचेही केस गेले तर तो काय करेल? मी त्याला म्हणालो, तुझ्याकडे भरपूर केस आहे तू काय केलंस? त्याचे केस जरी गळाले तरी तो त्याचं नशीब गमवणार नाही कारण नशीब केसांमध्ये नाही तर कपाळावर लिहिलेलं असतं.”
हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर त्याचा बहुचर्चित ‘फायटर’ चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘फायटर’ देशभक्तीपर चित्रपट असणार आहे. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. या चित्रपटात हृतिकबरोबर दीपिका पादुकोण मुख्य भूमिका साकारणार आहे. याशिवाय चित्रपटात अनिल कपूर, करण सिंग ग्रोवर आणि तलत अजीज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.