Aamir Khan Girlfriend Gauri : आमिर खान त्याच्या नव्या गर्लफ्रेंडमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. ६० वर्षांचा आमिर खान दीड वर्षापासून गौरी स्प्रॅट या महिलेला डेट करतोय. आमिरने स्वतः माध्यमांसमोर प्रेमाची कबुली दिली आणि गर्लफ्रेंड गौरीची ओळख करून दिली. आमिरला त्याच्या रिलेशनिपवरून ट्रोल केलं जात आहे. चित्रपट निर्माता विक्रम भट्टने आमिर व गौरीच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
“जर मी ५० व्या वर्षी लग्न करू शकतो, तर आमिर खान ६० व्या वर्षी जोडीदार का शोधू शकत नाही? वय हा फक्त एक आकडा आहे. आनंदी राहायला कोणतंही वय नाही. आयुष्य जसजसे पुढे जाते, तसतशी नातेसंबंध आणि लैंगिकतेच्या एक्साइटमेंट थांबते. या वयात कुणीतरी तुमचा हात पकडायला, तुम्हाला समजून घ्यायला सोबत असेल तर त्याच काहीच चुकीचं नाही. मी आमिरसाठी खूप खूश आहे की त्याला असं कोणीतरी भेटलंय. मी आमिरला शुभेच्छा देतो, कारण तो एक चांगला माणूस आहे,” असं इ-टाइम्सशी बोलताना
विक्रम भट्ट म्हणाले.
आमिरने सांगितलं की गौरी त्याचे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि बॉलीवूड स्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांना भेटली आहे. त्याची मुलं जुनैद खान, आयरा खान आणि आझाद राव खान यांच्याशी आमिरने गौरीची ओळख करून दिली आहे. त्याच्या कुटुंबियांनी गौरीचं कुटुंबात स्वागत केलं आहे.
आमिर म्हणाला, “गौरी आणि माझी भेट २५ वर्षांपूर्वी झाली होती आणि आता आम्ही पार्टनर्स आहोत. आम्ही एकमेकांबद्दल खूप गंभीर आहोत आणि कमिटेड आहोत. आम्ही दीड वर्षांपासून एकत्र आहोत.” आमिरने गौरीसाठी ‘कभी कभी मेरे दिल में..’ हे गाणंही गायलं.

गर्लफ्रेंडची ओळख करून दिल्यावर आमिर खान लग्नाबद्दल म्हणाला, “वयाच्या ६० व्या वर्षी मला लग्न करणं शोभतं की नाही हे माहीत नाही. पण माझी मुलं खूप आनंदी आहेत. माझं माझ्या दोन्ही पूर्वाश्रमीच्या पत्नींबरोबर खूप चांगलं नातं आहे, त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.”
आमिरने सांगितलं की त्याची मुलं आणि कुटुंबीय गौरीला भेटले आहेत आणि ते या दोघांच्या नात्याबद्दल आनंदी आहे. आमिर २००१ मधील सुपरहिट चित्रपट ‘लगान’चा संदर्भ देत म्हणाला, “भुवनला अखेर त्याची गौरी भेटली.”