बॉलीवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही तिच्या फॅशनमुळे कायम चर्चेत असते. अलीकडेच तिने परदेशात संपन्न झालेल्या ‘आयफा पुरस्कार’ (IIFA 2023) सोहळ्यात हजेरी लावली होती. ‘आयफा’च्या ग्रीन कार्पेटवर नोराने ऑरेंज मल्टीशेड कलरचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. नोरा फतेहीच्या या ड्रेसमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
हेही वाचा : “चाळीतलं बालपण, शिवाजी पार्क ते बालमोहन शाळा…” प्रिया बापटचा थक्क करणारा प्रवास; म्हणाली, “दादर म्हणजे…”
नोरा फतेही नेहमीच काही तरी हटके लूक करून पापाराझींना पोज देताना दिसते. बॉलीवूडमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्याच्या ग्रीन कार्पेटवर नोराने असाच काहीसा वेगळा पोशाख परिधान करीत हजेरी लावली होती, परंतु तिचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा : “लग्न, घटस्फोट त्यानंतर एकमेकांचे…” करिश्मा कपूरला पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…
नोराने ऑरेंज मल्टीशेड कलरच्या ऑफ शोल्डर गाऊनवर फुगवलेला भला मोठा श्रग घेतला होता. यामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे. नोराचा व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ट्रोल करताना एक युजरने म्हटले आहे की, “पावसाळ्यासाठी नोराने प्लास्टिकची सोय आतापासूनच केली आहे.” दुसऱ्या एका युजरने “या ड्रेसवर हा फालतू कपडा का घेतला आहेस?” असा प्रश्न नोराला विचारला आहे. तसेच काहींनी “नोरा तू एअर बलून्स घेऊन का फिरत आहेस?” अनेकांनी तिच्या ड्रेसची तुलना थेट चादरीशी केली आहे.
एकंदर नोराचा हा ड्रेस नेटकऱ्यांना फारसा आवडलेला नाही आणि नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स करीत तिला ट्रोल केले आहे.