IIFA Awards 2025: चित्रपटाची कथा, दिग्दर्शनाची मांडणी, कलाकारांचा अभिनय याची सांगड उत्तमरित्या बांधली गेली तर तो चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरतोच. याचं उत्तम उदाहरण म्हणजे किरण रावचा ‘लापता लेडीज’ ( Laapataa Ladies ) चित्रपट. १ मार्च २०२४ला प्रदर्शित झालेला ‘लापता लेडीज’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ९७व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ‘ऑस्कर २०२५’साठी भारताकडून ‘लापता लेडीज’ चित्रपट निवडण्यात आला होता. यंदाच्या ‘आयफा पुरस्कार २०२५’मध्ये किरण रावच्या या चित्रपटाने बाजी मारून सर्वाधिक पुरस्कार जिंकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आयफा पुरस्कार २०२५’ भारतातच आयोजित केला होता. ८ मार्चला ‘आयफा डिजिटल पुरस्कार’ सोहळा पार पडल्यानंतर ९ मार्चला ‘आयफा पुरस्कार २०२५’ झाला. या सोहळ्यात बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. तसंच महत्त्वाचं म्हणजे ‘लापता लेडीज’ चित्रपटाचा जलवा पाहायला मिळाला. या चित्रपटाने एक, दोन नव्हे तर १० पुरस्कार जिंकले.

‘आयफा पुरस्कार २०२५’मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘लापता लेडीज’ ठरला. तसंच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्काराची मानकरी किरण राव ( Kiran Rao ) ठरली. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने नितांशी गोयल हिला गौरविण्यात आलं. याव्यतिरिक्त ‘लापता लेडीज’ चित्रपटाने कोण-कोणते पुरस्कार जिंकले? जाणून घ्या…

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट – लापता लेडीज
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नितांशी गोयल (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – किरण राव (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री – प्रतिभा रांटा (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – रवि किशन (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक – संपत राय (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट गीत – प्रशांत पांडे- सजनी रे (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट एडिटिंग- जबीन मर्चेंट (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट पटकथा- स्नेहा देसाई (लापता लेडीज)
  • सर्वोत्कृष्ट मूळ कथा -बिप्लब गोस्वामी (लापता लेडीज)

दरम्यान, ‘लापता लेडीज’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा आमिर खानने सांभाळली होती. या चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम, रवि किशन आणि सतेंद्र सोनी असे बरेच कलाकार मंडळी झळकले होते. ‘लापता लेडीज’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. ४ ते ५ कोटी बजेट असलेल्या किरण रावच्या या चित्रपटाने जागतिक स्तरावर २६.२६ कोटींचा व्यवसाय केला होता.